उर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहतीत कचऱ्याचे ढीग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 23, 2021 04:12 IST2021-01-23T04:12:38+5:302021-01-23T04:12:38+5:30
जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील गर्ल्स हायस्कूल चौकनजीकच्या उर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहतीच्या प्रवेशद्वारापासून शेकडो नागरिक दररोज ये-जा करतात. मात्र, तेथे कचरा ...

उर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहतीत कचऱ्याचे ढीग
जिल्हाधिकारी कार्यालय मार्गावरील गर्ल्स हायस्कूल चौकनजीकच्या उर्ध्व वर्धा प्रकल्प वसाहतीच्या प्रवेशद्वारापासून शेकडो नागरिक दररोज ये-जा करतात. मात्र, तेथे कचरा कोण टाकतो, याची शहानिशा कुणीही करीत नाही. तेथे केवळ प्लास्टिकच्या उष्ट्या कपांचा खच पडलेला आहे. गोडव्यामुळे कपांवर मुंग्या, माशा घोंगावत असून, वराहदेखील ताव मारताना दिसून येत आहे. परिणामी दुर्गंधीसह डासांचा प्रादुर्भाव होऊन आजार वाढण्यास कारणीभूत ठरू शकतात. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांकडून व्यक्त होत आहे. याबाबत उर्ध्व वर्धा पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांशी संपर्क केला असता, होऊ शकला नाही.
बॉक्स
शासनाचे अक्षम्य दुर्लक्ष
प्रवेशद्वारासमोरच एक कॅफे असून, तेथे तरुणांची मोठ्या प्रमाणात गर्दी दिसून येते. आजूबाजूला कॅन्टीनदेखील थाटण्यात आलेल्या असल्याने नेमका कोण तेथे कचरा टाकतो, याकडे ना उर्ध्व वर्धा वसाहतीचे लक्ष, ना तेथून ये-जा करणाऱ्यांना देणे-घेणे, अशी स्थित निर्माण झाल्यामुळे संबंधितांचे हे वर्तन नित्याचेच झाल्याचे दिसू येत आहे.