गणोरीची सायली विदर्भ क्रिकेट १९ वर्षांखालील महिला संघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:11 IST2021-09-13T04:11:59+5:302021-09-13T04:11:59+5:30

बीसीसीआय डोमेस्टिक २०२१-२२ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा अमरावती : बीसीसीआय डोमेस्टिक २०२१-२२ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भाच्या १९ वर्षांखालील ...

Ganori Saily in Vidarbha Cricket Under-19 Women's Team | गणोरीची सायली विदर्भ क्रिकेट १९ वर्षांखालील महिला संघात

गणोरीची सायली विदर्भ क्रिकेट १९ वर्षांखालील महिला संघात

बीसीसीआय डोमेस्टिक २०२१-२२ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धा

अमरावती : बीसीसीआय डोमेस्टिक २०२१-२२ महिला एकदिवसीय क्रिकेट स्पर्धेसाठी विदर्भाच्या १९ वर्षांखालील संघात गणोरी (ता. भातकुली) येथील सायली राजेंद्र शिंदे हिची निवड झाली आहे. विदर्भ क्रिकेट टीम एलिट ए ग्रुपमध्ये असून राजकोट येथे या गटातील उत्तर प्रदेश, मुंबई, हैद्राबाद, आसाम, गुजरात व विदर्भ संघांदरम्यान २८ सप्टेंबर ते १८ ऑक्टोबर दjम्यान सामने खेळले जाणार आहेत.

सायलीचे वडील शेतकरी आहेत. ती गणोरी येथे आदर्श क्रिकेट ॲकेडमीमध्ये विजय चव्हाण यांच्या मार्गदर्शनात क्रिकेटचा सराव करते. विजय चव्हाण हे विदर्भ क्रिकेट असोसिएशनचे लेव्हल-१ प्रशिक्षक आहे. सायली यापूर्वी २०१८ मध्ये १९ वर्षांखालील विदर्भ महिला संघाकडून खेळली. २०१९ मध्ये या संघाचे सराव शिबिर विदर्भ महिला संघाची उपकर्णधार म्हणून गुंटूर येथे नेतृत्व केले तसेच २०१९ मध्ये २३ वर्षांखालील विदर्भ महिला संघाचे प्रतिनिधित्व केले.

Web Title: Ganori Saily in Vidarbha Cricket Under-19 Women's Team