गांगरखेड्याचा ‘बैलबाजार’ युवकांनी उधळला

By Admin | Updated: July 26, 2016 00:26 IST2016-07-26T00:26:26+5:302016-07-26T00:26:26+5:30

तालुक्यांतर्गत येणाऱ्या गांगरखेडा येथे आठवड्याच्या सोमवारी भरणारा बैलबाजार परिसरातील शेकडो युवकांनी उधळून लावला.

Gangatkheda 'bull market' youths evaporated | गांगरखेड्याचा ‘बैलबाजार’ युवकांनी उधळला

गांगरखेड्याचा ‘बैलबाजार’ युवकांनी उधळला

रोष : पोलीस अधीक्षकांना निवेदन, व्यापाऱ्यांचा पोबारा
चिखलदरा : तालुक्यांतर्गत येणाऱ्या गांगरखेडा येथे आठवड्याच्या सोमवारी भरणारा बैलबाजार परिसरातील शेकडो युवकांनी उधळून लावला. १२.३० वाजता काटकुंभ पोलीस चौकीत जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षकांना एक निवेदन देऊन बाजाराविषयी रोष व्यक्त करण्यात आला.
गांगरखेडा येथे सोमवारी भरणाऱ्या बैलबाजारात मध्यप्रदेशातील सर्वाधिक गुरे येत होती. या गाय, बैलांची खरेदी करण्यासाठी चांदूरबाजार तालुक्यातील शिरजगाव, करजगाव, अकोट आदी परिसरातील व्यापारी येत होते. अवैध कत्तलखाण्यासाठी खरेदी केल्या जात होती. या प्रकाराबद्दल नागरिकांमध्ये वर्षभरापासून संताप होता. चांदूरबाजार येथील खरवाडीच्या घटनेनंतर गांगरखेडा येथील बैलबाजार प्रकर्षाने सर्वांचे लक्ष केंद्रीत करणारा ठरला होता. येथील गुरे विक्रीमुळे नागरिकांमध्ये कमालीचा रोष निर्माण झाला आहे. सोमवारी काटकुंभ चौकीत निवेदनकर्त्यांमध्ये पीयूष मालवीय, संजू राठौर, नीलेश येवले, गजेंद्र येवले, गणेश बडवे, आलोक अलोकार, बबलू राठौर, रूपेश भक्ते, दीपक गोरले, शिवदास आठोले, प्रशांत उईके, प्रमोद धुर्वे, सचिन धुर्वे, नरेंद्र उईके आदींचा समावेश होता.

बाजार उधळून लावला
गावागावांत युवकांनी गौवंश हत्याविरुद्ध बैठका घेतल्या होत्या. आज सोमवारी गांगरखेडा येथे सकाळी ११ वाजता परिसरातील शेकडो युवक मोटरसायकली घेऊन एकत्र झाले होते. तेथे काही पशुपालकांनी आपली गुरे विक्रीला आणली. त्यांना समजावून सांगण्यात आले. तसेच व्यापाऱ्यांना रात्रीच सदर प्रकाराची कुणकुण लागल्याने पहाटे पाच वाजताच त्यांनी परिसरातून पोबारा केला. त्यामुळे पुढील अनर्थ टळला.

‘लोकमत’चा दणका
‘लोकमत’ने २३ जुलैच्या अंकात सर्वप्रथम गांगरखेडा येथील बैलबाजाराविरुद्ध वृत्त प्रकाशित केले होते. त्याच दिवसापासून परिसरातील नागरिकांनी बंदीसाठी रस्त्यावर उतरण्याचा इशारा दिला होता. ‘लोकमत’च्या वृत्ताचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.

Web Title: Gangatkheda 'bull market' youths evaporated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.