लुटारू टोळीतील महिलेस अटक

By Admin | Updated: October 26, 2016 00:20 IST2016-10-26T00:20:03+5:302016-10-26T00:20:03+5:30

महामार्गावर लुटारू टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळताच रविवारी पहाटे ४ वाजतादरम्यान सापळा रचून...

A gang of robbers gang arrested | लुटारू टोळीतील महिलेस अटक

लुटारू टोळीतील महिलेस अटक

नांदगाव पेठ : महामार्गावर लुटारू टोळी सक्रिय असल्याची माहिती पोलिसांना मिळताच रविवारी पहाटे ४ वाजतादरम्यान सापळा रचून टोळीतील मुख्य सूत्रधार महिलेला अटक केली. दोघे पळून जाण्यास यशस्वी झाले. सविता इंगळे (रा.अमरावती) असे त्या महिलेचे नाव आहे.
महामार्गावर उभे राहून एक महिला वाहनाला हात देऊन वाहन थांबवायची आणि वाहन थांबताच दोघांच्या साहाय्याने चालकाला लुटून त्याला मारहाण करण्याच्या घटना वाढल्या होत्या. त्या अनुषंगाने पोलीस निरीक्षक उमेश पाटील एपीआय राहुल जाधव व कर्मचाऱ्यांनी रविवारी पहाटे शिवनगाव येथून टोळीप्रमुख महिलेला रंगेहात अटक केली. दोन महिन्यांपूर्वी अशाच घटनेत या महिलेवर ३९४ अन्वये गुन्हा दाखल झाला. मात्र त्यावेळी तिने पलायन केले होते. नांदगाव पेठ पोलिसांनी दोन दिवसांपासून धाडसत्र राबवून ठिकठिकाणी नाकाबंदी केली. परिसरातील सराईत गुन्हेगारांचे धाबे दणाणले असून आरोपींवर पोलिसांची करडी नजर असल्याचे पोलीस निरीक्षक उमेश पाटील यांनी सांगितले.

Web Title: A gang of robbers gang arrested

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.