येवदा येथे गणेश विसर्जन शांततेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 21, 2021 04:14 IST2021-09-21T04:14:26+5:302021-09-21T04:14:26+5:30

येवदा : रविवारी येथील तरुण गणेशोत्सव मंडळ, नील कमल गणेश उत्सव मंडळ, बाल विजय गणेशोत्सव मंडळ, जय शिवाजी गणेश ...

Ganesha immersion in peace at Yevda | येवदा येथे गणेश विसर्जन शांततेत

येवदा येथे गणेश विसर्जन शांततेत

येवदा : रविवारी येथील तरुण गणेशोत्सव मंडळ, नील कमल गणेश उत्सव मंडळ, बाल विजय गणेशोत्सव मंडळ, जय शिवाजी गणेश उत्सव मंडळ, बालविकास विकास गणेश मंडळ, सूरज गणेश मंडळ या मंडळांनी गणेश विसर्जन शांततेत पार पाडले. कुठलीही वाद्य न वाजता, साध्या पद्धतीने कायद्याचे नियमाचे पालन करून गणेशाचे जयजयकार केला.

बाल विजय गणेश मंडळाने विसर्जनाच्या वेळी बैलबंडीमध्ये बाप्पांना विराजमान केल्याने येवदा गावासाठी ही मिरवणूक आकर्षणाचे केंद्र ठरली होती. तरुण गणेशोत्सव मंडळाने रक्तदान शिबिर घेऊन देशासाठी मोलाचे सहकार्य केले. येवदा व परिसरातील गणेश विसर्जन शांततेत झाले. कुठेही अनुचित प्रकार घडले नसल्याचे ठाणेदार अमूल बच्छाव, दुय्यम ठाणेदार दिलीप पाटील यांनी सांगितले. परिसरातील ३७ गावांमध्ये मंडळाचे २६ गणपती विराजमान झाले होते. येवदा हे अतिशय संवेदनशील असल्याने राखीव पोलीस दल तैनात केले होते.

Web Title: Ganesha immersion in peace at Yevda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.