जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे गांधी, शास्त्री जयंती

By Admin | Updated: October 3, 2016 00:16 IST2016-10-03T00:16:30+5:302016-10-03T00:16:30+5:30

जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)च्यावतीने जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली...

Gandhi, Shastri Jayanti by District Rural Congress | जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे गांधी, शास्त्री जयंती

जिल्हा ग्रामीण काँग्रेसतर्फे गांधी, शास्त्री जयंती

अमरावती : जिल्हा काँग्रेस कमिटी (ग्रामीण)च्यावतीने जिल्हाध्यक्ष अनिरुद्ध ऊर्फ बबलू देशमुख यांच्या अध्यक्षतेखाली २ आॅक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी व भारताचे माजी पंतप्रधान लाल बहादूर शास्त्री यांची जयंती साजरी करण्यात आली.
यावेळी महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेला काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांच्या हस्ते दीप प्रज्ज्वलन करून राष्ट्रपिता महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. प्रास्ताविक भैय्यासाहेब मेटकर यांनी केले.
यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी मनोगतात सत्य, अहिंसा, समानता, न्याय या तत्त्वांच्या माध्यमातून स्वातंत्र्य प्राप्तीसाठी मार्गदर्शन करणारे राष्ट्रपिता महात्मा गांधाींच्या व लाल बहादूर शास्त्री यांच्या जीवनशैलीवर विचार मांडलेत. कार्यक्रमाला माजी राज्यमंंत्री यशवंतराव शेरेकर, अ.भा.काँ.क. सदस्य विद्या देडू, महिला अध्यक्ष छाया दंडाळे, अनुसूचित जाती विभागाचे श्रीराम नेहरे, प्रकाश काळबांडे, प्रल्हाद ठाकरे, संजय वानखडे, उषा उताणे, सतीश धोंडे, संजय मापले, बापुराव गायकवाड, भागवत खांडे, जयंत देशमुख, बिट्टू मंगरोळे, युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष बच्चू बोबडे, बबलू बोबडे, दिलीप तायडे, विठ्ठल सरडे, ज्योती यावलीकर, नितीन यावलीकर, प्रदीप देशमुख, सुभाष पाथरे, कमलेश तायडे, बाबाराव कडू, विशाल भटकर, समाधान दहातोंडे, संजय जैन व पदाधिाकारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन व प्रास्ताविक भैय्यासाहेब मेटकर यांनी, तर आभार प्रदर्शन संजय मापले यांनी केले. (प्रतिनिधी)

Web Title: Gandhi, Shastri Jayanti by District Rural Congress

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.