‘ती’च्या गणपतीचे दिमाखदार स्वागत!

By Admin | Updated: September 19, 2015 00:18 IST2015-09-19T00:18:30+5:302015-09-19T00:18:30+5:30

कुटुंबाचा आणि समाजाचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजे ‘ती’. सृष्टीच्या निर्मितीचे श्रेयही तिच्याच पदरात. मग, विघ्नहर्त्याच्या अग्रपूजेचा पहिला मान तिला का मिळू नये?

Ganapati welcome the 'Ti'! | ‘ती’च्या गणपतीचे दिमाखदार स्वागत!

‘ती’च्या गणपतीचे दिमाखदार स्वागत!

संपूर्ण पुढाकार महिलांचाच : ‘लोकमत’चे अभिनव आयोजन
अमरावती : कुटुंबाचा आणि समाजाचा प्रमुख आधारस्तंभ म्हणजे ‘ती’. सृष्टीच्या निर्मितीचे श्रेयही तिच्याच पदरात. मग, विघ्नहर्त्याच्या अग्रपूजेचा पहिला मान तिला का मिळू नये? ‘लोकमत’ने चुटकीसरशी या प्रश्नाचे उत्तरही शोधले अन् ‘ती’च्या नेतृत्त्वात रविवारी बाप्पा वाजत-गाजत, उत्साहाने विराजमान झाले.
‘लोकमत’ ने यंदाच्या गणेशोत्सवात कृती, निर्मिती आणि संस्कृतीचा संदेश देणाऱ्या ‘आपले बाप्पा’ या उपक्रमाची सुरूवात केली. लोकमत सखी मंचद्वारे स्थानिक ‘लोकमत’ कार्यालयात महिलांच्या नेतृत्त्वात गणेशाची प्रतिष्ठापना करण्यात आली. सखीमंचच्या महिला सदस्य व लोेकमत परिवाराच्या महिला कर्मचाऱ्यांनी कार्यालयात विधिवत श्रीगणेशाची स्थापना केली.
श्रींच्या आगमनाच्या निमित्ताने कार्यालयात सुरेख सजावट करण्यात आलीे.
रंगीबेरंगी पताकांनी सजविलेल्या मखरात मंत्रोच्चारांच्या गजरात बाप्पा विराजमान झालेत. या आगळ्या उपक्रमात लोकमततर्फे दहा दिवस महिलांनाच पुजेचा व नियोजनाचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. ‘ती’चा गणपती प्रतिष्ठापना सोहळ्यात लोकमत सखीमंचच्या सदस्य नलिनी थोरात, रिता मोकलकर, कुंदा वंजारी आदींची उपस्थिती होती. (प्रतिनिधी)

बाप्पासोबत ‘सेल्फी’ पाठवा
यंदा लोकमतने ‘माझे बाप्पा, माझी सेल्फी’ हा आगळावेगळा उपक्रम देखील हाती घेतला आहे. या अंतर्गत नागरिकांनी बाप्पासोबत सेल्फी काढून ‘लोकमत’ कार्यालय, जिल्हा स्टेडियमनजीक, अमरावती या पत्त्यावर पाठवावीत. त्यांना ‘लोकमत’ मधून प्रसिध्दी दिली जाईल. नागरिकांनी त्यांच्या बाप्पासमवेतच्या सेल्फी ‘९६६५४९८१७० या व्हॉट्सअ‍ॅप’ क्रमांकावर पाठवाव्या.

‘लोकमत’ निर्माल्य संकलन अभियान
यंदाच्या गणेशोत्सवाला प्रदूषणमुक्त गणेशोत्सव करण्याच्या दृष्टीने लोकमतने एक पाऊल पुढे टाकले आहे. याच अनुषंगाने ‘लोकमत ुनिर्माल्य संकलन’ उपक्रम राबविला आहे. त्यातून सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी निघालेले निर्माल्य हे ‘संकलन बॅग’ मध्येच टाकावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

देऊया ‘ती’ला मान
‘लोकमत’च्यावतीने जिल्ह्यातील सार्वजनिक गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना गणेशोत्सवाच्या काळात एक दिवस ‘ती’ ला मान देण्याचे आवाहन केले आहे. यात महिलांना आरती-पूजा करण्याची संधी देण्याचे आवाहन केले आहे.

Web Title: Ganapati welcome the 'Ti'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.