दाभा येथे जुगार पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 04:16 IST2021-04-30T04:16:47+5:302021-04-30T04:16:47+5:30

अमरावती : बडनेरा पोलिसांनी दाभा येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह ४०५ रुपयांचा मुद्देमाल बुधवारी जप्त केला. आरोपी संजय बाळकृष्ण ...

Gambling at Dabha | दाभा येथे जुगार पकडला

दाभा येथे जुगार पकडला

अमरावती : बडनेरा पोलिसांनी दाभा येथे कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह ४०५ रुपयांचा मुद्देमाल बुधवारी जप्त केला. आरोपी संजय बाळकृष्ण कांबळे (५०, रा. पाचबंगला बडनेरा जुनी वस्ती)विरुद्ध गुन्हा नोंदविला. ही कारवाई एएसआय अहमद अली यांनी केली.

--------------------------------------------

जळका शहापूर येथे जुगार रेड

अमरावती : नांदगावपेठ पोलिसांनी जळका शहापूर येथे जुगारावर धाड टाकून २७० रुपयांचा मुद्देमाल बुधवारी जप्त केला. याप्रकरणी आरोपी सिद्धार्थ पांडूरंग तिकाडे (४२, रा. जळका शहापूर) विरुद्ध गुन्ह नोंदविला. ही कारवाई एएसआय प्रदीप शहाणे यांनी केली.

-------------------------------------------

बडनेरा नवीवस्तीत गावठी दारू पकडली

अमरावती : बडनेरा पोलिसांनी नवीवस्ती येथे कारवाई करून ५०० रुपये किमतीची गावठी दारू बुधवारी जप्त केली. आरोपी शेख अकील ऊर्फ जलहुवा शेख गफुर (५०, रा. यास्मिन नगर झोपडपट्टी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-------------------------------------------------------

हजार रुपयांची गावठी दारू जप्त

अमरावती : नांदगावपेठ पोलिसांनी रामगाव येथे कारवाई करून एक हजाराची दहा लीटर गावठी दारू बुधवारी जप्त केली. आरोपी अरविंद ऊर्फ बाबुलाल मुकिंदराव आठवले (४५, रा. रामगाव) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------------

जेवडनगरातून दारू जप्त

अमरावती : राजापेठ पोलिसांनी जेवडनगरात कारवाई करून ७८० रुपये किमतीची अवैध दारू बुधवारी जप्त केली. आरोपी आकाश विष्णू डोंगरे (२९, रा. जेवडनगर) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Gambling at Dabha