रामायणनगरात जुगार पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:27 IST2021-02-05T05:27:20+5:302021-02-05T05:27:20+5:30
अमरावती : बडनेरा पोलिसांनी येथील रामायणनगरात कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह २०८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रजासत्ताकदिनी करण्यात ...

रामायणनगरात जुगार पकडला
अमरावती : बडनेरा पोलिसांनी येथील रामायणनगरात कारवाई करून जुगाराच्या साहित्यासह २०८० रुपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रजासत्ताकदिनी करण्यात आली.
आरोपी शंतनू रामकृष्ण चव्हाण, नीलेश गंगाधर पवार, सागर संतोष जरे (तिन्हा रा. बडनेरा), मनीष राजू चिमने रा. बडनेरा असे आरोपीचे नाव आहे.
--------------------------------------------------------------------
कोंडेश्वर मार्गावर अवैध दारू जप्त
अमरावती: बडनेरा पोलिसानी येथील कोंडेश्वर मार्गावर धाड टाकून एका महिला आरोपीच्या ताब्यातून २४०० रुपयाची अवैध दारू जप्त केली ही कारवाई प्रजासत्ताकदिनी करण्यात आली. या प्रकरणी पोलिसानी एका महिलेविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
----------------------------------------------------------
परिहारपुर्यात हातभट्टीची दारू पकडली
अमरावती: फ्रेजरपुरा पोलिसानी येथील परिहारपुरा वडाळी येथे कारवाई करून हातभट्टीचे एक हजाराची अवैध दारू जप्त केली. ही कारवाई प्रजासत्ताकदिनी करण्यात आली. आरोपी भगवान रामराव सरवरे(४२, रा. अमरावती) याच्याविरुद्ध पोलिसानी गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.
-----------------------------------------------------------------
लक्ष्मीनगरात दारू जप्त
अमरावती: गाडगेनगर पोलिसानी येथील लक्ष्मीनगरात कारवाई करून अवैध दारू व एक दुचाकी असा एकूण ४० हजाराचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रजासत्ताकदिनी करण्यात आली. आरोपी दिपक शामलाल जयस्वाल (रा. लक्ष्मीनगर) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास सुरु आहे.
-------------------------------------------------------------------------
नागपुरीगेट पोलिसांची रतनगंजमध्ये कारवाई
अमरावती: नागपुरीगेट पोलिसानी येथील रतनगंज येथे कारवाई करून हातभट्टीचे तसेच इतर अवैध दारू असा एकूण ३०,९१० रूपयाचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई प्रजासत्ताकदिनी करण्यात आली. या प्रकरणी एका महिला आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदविला आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.