मलकापुरात जुगार पकडला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 8, 2021 04:14 IST2021-03-08T04:14:19+5:302021-03-08T04:14:19+5:30
अमरावती - बडनेरा पोलिसांनी येथील मलकापूर येथे धाड टाकून जुगार साहित्यासह ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी ...

मलकापुरात जुगार पकडला
अमरावती - बडनेरा पोलिसांनी येथील मलकापूर येथे धाड टाकून जुगार साहित्यासह ८३५ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शनिवारी करण्यात आली. आरोपी राजू बाजीराव गायकवाड (४९, रा. बडनेरा) विरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला.
---------------------------------------
पुसदा येथे अवैध दारू जप्त
अमरावती : वलगाव पोलिसांनी शनिवारी पुसदा येथून ८४० रुपयांची अवैध दारू जप्त केली. आरोपी प्रवीण गंगाधरराव चोपडे (२८), गजानन गंगाधर चोपडे (३०, दोन्ही रा. पुसदा) विरुद्ध गुन्हा नोंदविला.
------------------------------------------------
पुतणीचा लैगिंक छळ करण्याचा प्रयत्न करणाऱ्या काकाला न्यायालयीन कोठडी
अमरावती : पुतणीचा लैगिंक छळ करणाऱ्या आरोपी काकाला रविवारी न्यायालयासमोर हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली. सहा वर्षीय अल्पवयीन पुतणीचा लैगिंक छळ करण्याचा प्रयत्न फ्रेजरपुरा ठाणे हद्दीत शुक्रवारी रात्री झाला. याप्रकरणी पोलिसांनी शनिवारी गुन्हा नोंदवून तातडीने आरोपीला अटक केली. रविवारी त्याला न्यायालयासमोर हजर केल्याचे पोलिसांनी सांगितले.