लालखडी येथे जुगार पकडला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:12 IST2021-04-25T04:12:32+5:302021-04-25T04:12:32+5:30

अमरावती : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लालखडी येथे जुगाराचे साहित्य व मोबाईल असा एकूण १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल ...

Gambling caught at Lalkhadi | लालखडी येथे जुगार पकडला

लालखडी येथे जुगार पकडला

अमरावती : शहर गुन्हे शाखेच्या पथकाने लालखडी येथे जुगाराचे साहित्य व मोबाईल असा एकूण १३ हजार ४६० रुपयांचा मुद्देमाल शुक्रवारी जप्त केला. याप्रकरणी पोलिसांनी आरोपी राहुल अरुण ठाकरे, (३४, रा. अंबाविहार), शेख अकबर शेख हसन (४२, रा. लालखडी) विरुद्ध गुन्हा नोंदविला.

---------------------------------------------

परिहारपुरा येथे अवैध दारू जप्त

अमरावती : फ्रेजरपुरा पोलिसांनी येथील वडाळी परिहारपुरा येथे कारवाई करून २,७७० रुपयांच्या अवैध दारुसह मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई शुक्रवारी करण्यात आली. याप्रकरणी आरोपी संतोष मोहन बेनीवाल (४१,रा. परिहरापुरा) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

-----------------------------------------

इब्राहीमपुरा येथे दारू पकडली

अमरावती : भातकुली पोलिसांनी येथील इब्राहीमपूर येथील आरोपीच्या घरी कारवाई करून त्याच्या ताब्यातून १,२०० रुपयांची अवैध दारू शुक्रवारी जप्त केली. आरोपी वेदांत धरमदास शिरसाट (२५, रा. इब्राहीमपूर ता. भातकुली) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Gambling caught at Lalkhadi