जुगाऱ्यांची पोलिसांना धक्काबुक्की

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2021 04:12 IST2021-04-12T04:12:24+5:302021-04-12T04:12:24+5:30

वरूड : नजीकच्या तिवसाघाट येथे मटका जुगारावर कारवाई करतेवेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाशी धक्काबुक्की करण्यात आली. शनिवारी रात्री साडेनऊला ...

Gamblers push the police | जुगाऱ्यांची पोलिसांना धक्काबुक्की

जुगाऱ्यांची पोलिसांना धक्काबुक्की

वरूड : नजीकच्या तिवसाघाट येथे मटका जुगारावर कारवाई करतेवेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाशी धक्काबुक्की करण्यात आली. शनिवारी रात्री साडेनऊला हे धाडसत्र राबविण्यात आले. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली.

नितेश ऊर्फ बाल्या गोविंद खेरडे, केशव रमेश सावरकर (दोघेही रा. तिवसाघाट) अशी आरोपींची नावे आहेत. स्थानिक गुन्हे शाखा आणि शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपीच्या घरी पंचांसमक्ष जुगार रेड केली असता, रामेश्वर गणोरकर व रोशन गणोरकर यांच्या ताब्यातून ८ हजार ७२० रुपये, चार चिट्ठी व दोन बॉल पेन मिळून आले. कायदेशीर कारवाई करीत असताना मोहल्ल्यातील या आरोपींनी संगनमत करून पोलीस स्टाफच्या अंगावर येऊन धक्काबुक्की केली. यामध्ये पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर यांच्या ताब्यात असलेली रक्कम, १ ते १० आकडे लिहिलेल्या चार चिट्ठी व दोन बॉल पेन खाली पडले. शोध घेतला असता, मिळून आले नाही. परिणामी, सरकारी कामात अडथळा निर्माण केला असल्याची तक्रार पोलीस उपनिरीक्षक सूरज सुसतकर यांनी शनिवार रात्री शेंदूरजनाघाट पोलिसांत नोंदविली.

आरोपीविरुद्ध भादंविचे कलम ३५३, १८८ सहकलम १२ (अ) मुंबई जुगार कायदा अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे. पुढील तपास प्रभारी ठाणेदार सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक सचिन कानडे, संजय रोतवालसह शेंदूरजनाघाट पोलीस करीत आहेत.

Web Title: Gamblers push the police

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.