लोकमत न्यूज नेटवर्कवरूड : पालिका प्रशासनाने गुरुवारपाठोपाठ शुक्रवारीदेखील शहरातील अतिक्रमणावर बुलडोझर फिरविला. पोलिसांच्या सहकार्याने ही मोहीम हाती घेण्यात आली आहे. तथापि, प्रमुख चौक व बाजारपेठेतील अतिक्रमण दूर करताना पालिका व पोलिसांना फारसे सहकार्य मिळाले नसल्याचे चित्र या दोन दिवसांत निदर्शनास आले. शहरातील रहदारीच्या रस्त्यावरच्या अतिक्रमणासोबतच अनेक दुकानदारांनी दुकानापुढे टिनशेड उभारले. त्यामुळे फुटपाथ गायब झालेत. पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते. वाटेल तेथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून मनमानी कारभार सुरू झाला होता. अखेर आयपीएस अधिकारी तथा ठाणेदार श्रेणिक लोढा व मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस धडाक्यात सुरुवात झाली आहे. शहरातील रस्त्यावर तसेच पादचारी मार्गावर अतिक्रमण काढणे आवश्यक होते. तक्रारी वाढल्या होत्या. मुनादी देऊन अतिक्रमणधारकांना वेळ देण्यात आला होता. मात्र, अतिक्रमण कायम असल्याने मोहिमेस सुरुवात करण्यात आल्याचे पोलीस व पालिकेने सांगितले. मोहिमेत सातत्य राहावे, अशी अपेक्षा नागिरक व्यक्त करीत आहेत.
वरूडमध्ये दुसऱ्या दिवशीही ‘गजराज’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 12, 2020 05:00 IST
शहरातील रहदारीच्या रस्त्यावरच्या अतिक्रमणासोबतच अनेक दुकानदारांनी दुकानापुढे टिनशेड उभारले. त्यामुळे फुटपाथ गायब झालेत. पादचाऱ्यांना रस्त्याने चालणे कठीण झाले होते. वाटेल तेथे दुचाकी, चारचाकी वाहने उभी करून मनमानी कारभार सुरू झाला होता. अखेर आयपीएस अधिकारी तथा ठाणेदार श्रेणिक लोढा व मुख्याधिकारी रवींद्र पाटील यांच्या संयुक्त प्रयत्नातून अतिक्रमण निर्मूलन मोहिमेस धडाक्यात सुरुवात झाली आहे.
वरूडमध्ये दुसऱ्या दिवशीही ‘गजराज’
ठळक मुद्देअतिक्रमण निर्मूलन मोहीम : पालिका, पोलिसांना सहकार्य नाही