अतिक्रमणावर गजराज

By Admin | Updated: October 19, 2016 00:15 IST2016-10-19T00:15:38+5:302016-10-19T00:15:38+5:30

मंगळवारी सकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशन-इर्विन चौक ते बियाणी चौकातील वाहतुकीस बाधा ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले.

Gajraj on encroachment | अतिक्रमणावर गजराज

अतिक्रमणावर गजराज

अमरावती : मंगळवारी सकाळच्या सुमारास रेल्वे स्टेशन-इर्विन चौक ते बियाणी चौकातील वाहतुकीस बाधा ठरणारे अतिक्रमण काढण्यात आले. तेथून पंचवटी, गाडगेनगर या मुख्य रस्त्यावरील भाजीपाला/फळ विक्रेत्यांचे तसेच नास्तावाल्यांचे अतिक्रमण काढण्यात आले. कठोरा रोड वळणावर असलेले हातगाड्या/पानठेले वाल्यांचे अतिक्रमण काढून साहित्य जप्त करण्यात आले. तेथून राजकमल चौक महानगरपालिकेच्या दोन्ही गेटसमोरील अतिक्रमण काढण्यात आले. राजकमल चौक ते गांधी चौक, तहसील कार्यालय, श्याम चौक, जयस्तंभ चौक येथील हातगाड्या व इतर अतिक्रमणधारकांचे अतिक्रमण काढण्यात आले. सदर कार्यवाहीमध्ये दोन ट्रक साहित्य जप्त करण्यात आले आहे. सदर कार्यवाहीमध्ये अतिक्रमण विभागातील निरिक्षक प्रवीण इंगोले, निरिक्षक उमेश सवाई, मनपा पोलीस पथकातील विजय चव्हाण (पी. एस. आय.) व इतर पोलीस कर्मचारी व महिला पोलीस कर्मचारी व मनपा अतिक्रमण विभागाचे कर्मचारी उपस्थित होते. १८/१०/२०१६ ला सायंकाळी ६ वाजतापासून अतिक्रमण कार्यवाही करण्यात आली. रुख्मिनीनगर, मालटेकडी, ट्रेझरी कार्यालय, पंचवटी, गाडगेनगर या रस्त्यावरील अतिक्रमण काढण्यात आले. (प्रतिनिधी)

Web Title: Gajraj on encroachment

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.