शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुतीमध्ये २०७ जागांवर एकमत, कोण किती जागा लढवणार? अमित साटमांनी सांगितला आकडा
2
‘अरवली’बाबत सुप्रीम कोर्टाने स्वत: घेतली दखल, सरन्यायाधीश सोमवारी करणार सुनावणी
3
भयंकर हिमवृष्टीमुळे अमेरिकेला हुडहुडी;  न्यूयॉर्क, न्यूजर्सीमध्ये आणीबाणी, १६ हजार विमान उड्डाणांवर परिणाम  
4
'पुष्पा २' प्रीमियर चेंगराचेंगरी प्रकरणात अभिनेता अल्लू अर्जुनसह २३ जण दोषी, आरोपपत्र दाखल
5
ठाण्यात मनसेला मोठा धक्का, राजन गावंड यांचा शिंदेसेनेत जाहीर प्रवेश   
6
जम्मू काश्मीर: ३० ते ३५ दहशतवादी लपल्याची शंका, बर्फवृष्टीतही भारतीय सैन्याची शोधमोहिम सुरु
7
भररस्त्यात पाठलाग करून मंगेश काळोखेंवर केले २७ वार; आरोपींच्या निर्दयीपणाचे 'सीसीटीव्ही' फुटेज समोर
8
’मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांवर मोक्का लावून कठोरात कठोर कारवाई करणार’, एकनाथ शिंदे यांचं आश्वासन
9
मैदानातच आला हृदयविकाराचा झटका, प्रसिद्ध प्रशिक्षकाचं निधन, बांगलादेश क्रिकेटवर शोककळा  
10
भाजपा, शिंदेसेनेत युतीसाठी कोणतीही अडचण नाही; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची स्पष्टोक्ती
11
VIDEO: खतरनाक! समुद्राच्या तळाशी पोहणाऱ्या डायव्हरवर अचानक ऑक्टोपसने केला हल्ला अन् मग...
12
ठाण्यात तीन प्रभागावरून युती अडली; आज तोडगा निघण्याची शक्यता, १२ जागांवरून अडले घोडे
13
Solapur Municipal Election: काँग्रेसने २० उमेदवारांच्या नावाची केली घोषणा, पहिल्या यादीत कुणाची नावे?
14
खोपोलीतील घटना अत्यंत निंदनीय, निषेध करत सुनिल तटकरे यांनी मुख्यमंत्र्यांकडे केली मोठी मागणी
15
"PM मोदींचा हा वन मॅन शो फक्त..."; मनरेगाच्या नामांतरावरून सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल, काँग्रेस ५ जानेवारीपासून रस्त्यावर उतरणार
16
VIDEO : इटलीच्या बॅटरकडून शाहीन आफ्रिदीची धुलाई; पाक गोलंदाजावर 'लंगडी' घालत मैदान सोडण्याची वेळ!
17
शिंदेसेनेच्या बैठकीत राडा? शहरप्रमुख नाना भानगिरे रागारागात बाहेर पडले आणि गेले निघून; व्हिडीओ आला समोर
18
जळगाव: बापच बनला हैवान! चौथी मुलगी झाल्याच्या रागातून अवघ्या ३ दिवसांच्या मुलीची हत्या
19
बांगलादेशमध्ये एका मिस्ट्री गर्लची एंट्री, बनू शकते भविष्यातील शेख हसीना किंवा खलिदा झिया
20
Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
Daily Top 2Weekly Top 5

सुवर्णालंकार लुटणारी आंतरराज्यीय टोळी गजाआड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2019 01:23 IST

चांदूरबाजार येथील भवानी ज्वेलर्स फोडणाऱ्या चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील तीन जणांना अटक केली असून, दोन अद्यापही पसार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

ठळक मुद्देसाडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त। स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांची धडाकेबाज कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कअमरावती : चांदूरबाजार येथील भवानी ज्वेलर्स फोडणाऱ्या चोरांच्या आंतरराज्यीय टोळीचा पोलिसांनी पर्दाफाश केला. स्थानिक गुन्हे शाखेने या टोळीतील तीन जणांना अटक केली असून, दोन अद्यापही पसार आहेत. पोलिसांनी आरोपींकडून सोन्या-चांदीच्या ऐवजासह रोख असा सात लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.पोलीस सूत्रानुसार, शिवासिंग पीरसिंग दुधाती शिकलकरी (२८, रा. आंबोली, ठाणे, मुंबई), मुखत्यारसिंग जोगनसिंग टांक (३२, रा. वडाळी) व करणसिंग छगनसिंग भोंड (२४, रा. जालना) अशी अटकेतील आरोपींची नावे आहेत. ९ आॅगस्ट रोजीच्या मध्यरात्री २.३० वाजताच्या सुमारास चांदूर बाजारातील भवानी ज्वेलर्स फोडून अज्ञात चोरांनी ३१ लाख ६० हजारांचे सोन्या-चांदीचे दागिने व रोख असा मुद्देमाल चोरून नेला होता. या घटनेमुळे जिल्ह्यात प्रचंड खळबळ उडाली. धनंजय गोविंद सांबधारे (४५) यांच्या तक्रारीवरून चांदुरबाजार पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदविला. घटनेचे गाभीर्य पाहता पोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. व अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांनी घटनास्थळी भेट देऊन पोलिसांनी गुन्ह्याचा छडा लावल्याच्या सूचना केल्या. त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे शाखेची पाच पथके तयार करून, त्यांना वेगवेगळ्या दिशेने तपासाचे काम देण्यात आले. आरोपी ज्या मार्गाने चांदूर बाजारपर्यंत दाखल झालेत, अशा सर्व मार्गावरील सीसीटीव्ही फुटेज पाहण्यात आले. या चौकशीदरम्यान आरोपींनी चांदूरबाजारात चोरी करण्यापूर्वी कारंजा घाडगे व नागपूर रोडवरील कोंढाळीतील ज्वेलरी दुकान फोडल्याचे निदर्शनास आले. त्यानंतर आरोपी हे नागपूरच्या दिशेने पसार झाले. आरोपींनी काटोल मार्ग वरूडात प्रवेश केला. तेथून ९ आॅगस्ट रोजीच्या रात्री आसेगावात जाऊन एक ज्वेलर्स शॉप फोडण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर रात्री २.३० वाजताच्या भवानी ज्वेलर्स फोडले.एलसीबीचे यशस्वी डिटेक्शनपोलीस अधीक्षक हरिबालाजी एन. यांनी वेळोवेळी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांना मार्गदर्शन केले. पोलीस निरीक्षक सुनील किनगे यांच्या नेत्तृत्वात सहायक पोलीस निरीक्षक मुकुंद कवाडे, पेंदोर, एएसआय मूलचंद भांबूरकर, पोलीस हवालदार सचिन मिश्रा, शकील चव्हाण, संदिप लेकुरवाळे, सुनील तिडके, नितेश तेलगोटे, त्र्यंबक मनोहरे, विनोद इंगळे, गजेंद्र ठाकरे, प्रवीण अंबाडकर व सायबरच्या टीमने मोठे परिश्रम घेऊन या गुन्ह्याचा छडा लावला.७ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्तपोलिसांनी आरोपींकडून ८०० ग्र्रॅमची चांदी, १७० गॅ्रमचे सोन्याचे दागिने व ५९ हजारांची रोख जप्त केली आहे. याशिवाय गुन्ह्यातील साहित्य व नकली दागिनेसुद्धा पोलिसांनी जप्त केले आहे.मुंबईत शिकलकरींचा सोने विक्रीचा व्यवसायभवानी ज्वेलर्स फोडून आरोपी रिधोरा येथे गेले आणि तेथे गुन्ह्यात वापरलेले साहित्य फेकून दिले. या गुन्ह्यात वडाळी येथील रहिवासी मुखत्यारसिंग असल्याची माहिती पोलिसांच्या हाती चौकशीत लागली. पोलिसांनी वडाळीत जाऊन पाहणी केली असता, तो घरी सापडला नाही. तो मुंबई गेल्याची माहिती मिळताच पोलिसांची दोन पथके मुंबईला रवाना करण्यात आली. मुंबईतील ठाणे स्थित आंबोली शिकलकरी सोनेविक्रीचा व्यवसाय करीत असल्याचे पोलिसांना माहिती पडले. त्यानुसार पोलिसांनी पंटरला पाठवून दागिने विक्रीबाबत खात्री केली. तेथून पोलिसांनी शिवा दुधातीला अटक करून, त्याच्याजवळील सोने व रोख जप्त केली. त्याच्या माहितीवरून पोलिसांनी अंबरनाथवरून मुखत्यारसिंगला व जालनावरून करणसिंग भोंड यांना अटक केली. त्यांच्याकडून माहिती काढून घेण्यात येत आहे.मुरगड ठाण्याच्या हद्दीतून चोरली कारआरोपींनी गुन्हे करण्याच्या उद्देशाने मुरगड पोलीस ठाण्याच्या हद्दीतून एक कार चोरली होती. त्या कारने विविध शहर तथा राज्यात फिरून ते चोरी करीत होते.राज्यासह आंध्रातही केली चोरीआंतरराज्यीय टोळीतील मुख्य सूत्रधार शिवासिंग दुधाती हा त्याच्या सहकाऱ्यांसोबत चोरी करीत होता. राज्यातील मुंबई, कल्याण, ठाणे याशिवाय आंध्रप्रदेशातही त्यांनी चोरी केल्याची कबुली दिली आहे.

टॅग्स :Thiefचोर