वडाच्या आश्रयाला गुरे-ढोरे..
By Admin | Updated: May 14, 2015 00:03 IST2015-05-14T00:03:14+5:302015-05-14T00:03:14+5:30
सूर्यनारायण चांगलाच तापतोय. प्रखर उन्हामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे.

वडाच्या आश्रयाला गुरे-ढोरे..
.सूर्यनारायण चांगलाच तापतोय. प्रखर उन्हामुळे सामान्य जनता हैराण झाली आहे. मग, मूक पशूृ-पक्ष्यांबद्दल तर बोलायलाच नको. कडाक्याच्या उन्हामुळे चराईसाठी सोडलेल्या पाळीव जनावरांच्या अंगाचीदेखील लाहीलाही होतेय. वडगाव माहोरे येथे विशाल वटवृक्षाच्या सावलीत कडक उन्हापासून बचाव करण्याकरिता या गाई-म्हशी-बकऱ्यांनी असा ठिय्या मांडला. थंडगार सावलीत भर दुपारी रवंथ करीत पहुडलेली ही जनावरे पाहून उन्हाच्या प्रखरतेची कल्पना येते.