नदीत वाहून गेलेल्या ग्रा. पं. कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 11, 2021 04:15 IST2021-09-11T04:15:05+5:302021-09-11T04:15:05+5:30

निमखेड बाजार ग्रा. प. कर्मचारी बब्बूभाई ऊर्फ साहेबखा पठाण(५८)यांचा मृतदेह आज दुपारी ४ वाजता गावंडगाव येथील चांदसूर्या नदीत सापडला. ...

G. carried in the river. Pt. Employee's body found! | नदीत वाहून गेलेल्या ग्रा. पं. कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला!

नदीत वाहून गेलेल्या ग्रा. पं. कर्मचाऱ्याचा मृतदेह सापडला!

निमखेड बाजार ग्रा. प. कर्मचारी बब्बूभाई ऊर्फ साहेबखा पठाण(५८)यांचा मृतदेह आज दुपारी ४ वाजता गावंडगाव येथील चांदसूर्या नदीत सापडला. पर्वा बुधवारी दुपारी खिराडा येथील नाला पायी पार करीत असताना पाण्याच्या प्रवाहात ते वाहून गेले होते. शासनाचे रेस्क्यु पथक कालपासून त्यांचा शोध घेत होते; मात्र निमखेडच्याच काही युवकांना गावंडगाव येथील पुलाच्या पुढे छिन्न अवस्थेत मृतदेह दिसून आला. घटनास्थळी राहिमपूर पोलीस, महसूल विभागाच्या आपत्ती निवारण पथक आणि अधिकारी उपस्थित होते. पंचनामा, शवविच्छेदन आदी हे वृत्त लिहिपर्यंत चालू होते.

सदर कर्मचारी सेवानिवृत्त होण्यास अवघे काही दिवस बाकी होते. गावातील एका युवकाचे सोबत दुचाकीहून गावास परत येताना खिराडानजीक नाल्यास पाणी होते म्हणून दोघांनीही दुचाकी लोकांच्या मदतीने पैलतीरी नेली आणि पायी हा नाला पार करताना दुर्घटना घडली. या नाल्यावर दरवर्षीच दुर्घटना घडतात; पण जिल्हा परिषदेचे पदाधिकारी व प्रशासन कुंभकर्णी झोपेत आहे. पूल बांधण्याची गावकरी वाट पाहत आहेत.

Web Title: G. carried in the river. Pt. Employee's body found!