प्रशिक्षणातून घडतोय भविष्याचा कामगार
By Admin | Updated: July 6, 2016 00:14 IST2016-07-06T00:14:33+5:302016-07-06T00:14:33+5:30
उच्चशिक्षित विद्यार्थ्याला नोकरीची हमी असते. मात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणातून भविष्याचा कामगार घडतोय, असे मत आ़वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले़

प्रशिक्षणातून घडतोय भविष्याचा कामगार
वीरेंद्र जगताप : आयटीआयला आर्थिक मदत
धामणगाव रेल्वे : उच्चशिक्षित विद्यार्थ्याला नोकरीची हमी असते. मात्र औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षणातून भविष्याचा कामगार घडतोय, असे मत आ़वीरेंद्र जगताप यांनी व्यक्त केले़
जिल्ह्यात सर्वाधिक पारदर्शक व प्रत्येकांना योग्य प्रशिक्षण देणाऱ्या येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या प्रांगणात आ़वीरेंद्र जगताप यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी जि़प़ अध्यक्ष सतीश उईके, जि़प़सदस्य मोहन घुसळीकर, उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते, तहसीलदार चंद्रभान कोहरे, महेशकुमार शिडाम, गट विकास अधिकारी माया वानखडे यांची उपस्थिती होती़ येथील प्रांगणात ५०० वृक्षांचे रोपण आ़ जगताप यांच्या उपस्थितीत झाले़ चांदूररेल्वे, धामणगाव येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेला आतापर्यंत निधीद्वारे २ कोटी रूपयांची मदत केली़ ग्रामीण विद्यार्थ्यांनी आयटीआयकडे वळावे, असे आवाहन त्यांनी केले़ वृक्ष संगोपनाची जबाबदारी विद्यार्थ्यांनी स्वीकारावी, असे मत उपविभागीय अधिकारी जनार्धन विधाते यांनी व्यक्त केले़ यावेळी प्रशिक्षणार्थी उपस्थित होते़ (तालुका प्रतिनिधी)