उपअभियंत्यावर रोष
By Admin | Updated: December 29, 2014 23:35 IST2014-12-29T23:35:14+5:302014-12-29T23:35:14+5:30
एरवी शांत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका रेखा तायवाडे यांनी सोमवारी घरकूल प्रकरणाच्या फाईल महापालिका उपअभियंत्यावर प्रचंड रोष व्यक्त केला. चिरीमिरी करुन घरकूल प्रकरणांना मंजुरी देत,

उपअभियंत्यावर रोष
महिला नगरसेविका आक्रमक : घरकूलची फाईल गहाळ
अमरावती : एरवी शांत असलेल्या शिवसेनेच्या नगरसेविका रेखा तायवाडे यांनी सोमवारी घरकूल प्रकरणाच्या फाईल महापालिका उपअभियंत्यावर प्रचंड रोष व्यक्त केला. चिरीमिरी करुन घरकूल प्रकरणांना मंजुरी देत, गरिबांची फसवणूक करता, असा आरोप करीत फायलींची फेकाफेक केली.
महापालिकेत घरकूल प्रकरणाची जबाबदारी शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांच्याकडे सोपविण्यात आली आहे. त्यांच्या मदतीला उपअभियंता भास्कर तिरपुडे, हंबर्डे, भटकर आदी आहेत. मात्र विलासनगर प्रभागातील घरकूल मंजुरीची प्रकरणे मागील ९ महिन्यांपासून उपअभियंता भास्कर तिरपुडे हेतुपुरस्सर प्रलंबित ठेवत असल्याचा आरोप रेखा तायवाडे यांनी केला. घरकूल मंजुरीची फायली आहेत कुठे, असा जाब विचारात तिरपुडे यांच्यावर फायली भिरकावल्या. यावेळी रेखा तायवाडे या प्रचंड संतापल्या होत्या. विशिष्ट सदस्यांचे घरकूल प्रकरणे मंजूर कशी होतात, याविषयी त्यांनी उपअभियंत्यांना धारेवर धरले. गरीब सामान्य कुटुंबातील महिला घरकूल मेळावे यासाठी महापालिकेत पायऱ्या झिजवून थकून गेल्या आहेत. वारंवार घरकुलाची प्रकरणे निकाली काढावीत, असे सांगितल्यानंतरही अभियंते दखल घेत नाही, असा आरोप नगरसेविका रेखा तायवाडे यांनी केला.
जे लाभार्थी अधिकाऱ्यांना पैसे देतात, त्यांची प्रकरणे त्वरेने मंजूर केली जातात, असा प्रकार दलित वस्ती विकास विभागात सुरू असल्याचे तायवाडे यांचे म्हणणे आहे. उपअभियंत्यासोबत फाईल गहाळ झाल्याप्रकरणी वाद सुरू असताना त्यांच्या मदतीला शिवसेनेचे सुनील राऊत धावून आले. रेखा तायवाडे यांची समजूत घालण्याचा शहर अभियंता ज्ञानेंद्र मेश्राम यांनी प्रयत्न केला. मात्र त्यांच्या प्रयत्नाला फार यश मिळाले नाही. चिरीमिरी घेत असल्याचा आरोप त्यांनी केला.