फुटाणे विक्रेत्याच्या मुलाची उत्तुंग भरारी
By Admin | Updated: May 26, 2016 01:19 IST2016-05-26T01:19:10+5:302016-05-26T01:19:10+5:30
मनात जिद्द व अथक परिश्रम घेण्याची ताकद असली तर यश खेचून आणणे अवघड जात नाही़ वडील फुटाणे विक्रीचा व्यवसाय ...

फुटाणे विक्रेत्याच्या मुलाची उत्तुंग भरारी
राहुल गुप्ता ९१.५३ : जिद्दीच्या बळावर यश
धामणगाव रेल्वे : मनात जिद्द व अथक परिश्रम घेण्याची ताकद असली तर यश खेचून आणणे अवघड जात नाही़ वडील फुटाणे विक्रीचा व्यवसाय व आई गृहिणी तसेच घरी कोणतेही शैक्षणिक वातावरण नसताना शहरातील राहुल गुप्ताने संघर्षावर मात करीत ९१़५३ टक्के गुण मिळविले आहे़
स्थानिक कॉटन मार्केट चौकात गुप्ता यांचे छोटेसे फुटाणे विक्रीचे दुकान आहे़ विद्यानगरीची मान उंचावणाऱ्या राहुलचे वडील सरोज गुप्ता हे तालुक्यातील आठवडी बाजारात फुटाणे विक्री करण्याचा व्यवसाय करतात़ दररोज येणाऱ्या या फुटाणे विक्रीतून संसाराचा गाडा चालविणाऱ्या वडिलाच्या अथक परिश्रमाची जाण राहुलला आहे. कॉलेजमधून आल्यानंतर वडिलाच्या व्यवसायाला हातभार लावत होता. रात्री अभ्यास करणाऱ्या राहुलने शिकवणी वर्ग लावला नाही़ केवळ दोन तास अभ्यास करून ९१ टक्के गुण मिळविलेल्या राहुलचे अभियंता व्हायचे स्वप्न आहे़ यापूर्वी कोणीही कुटुंबातील सदस्य गुणवत्ता यादीत झळकला नाही. त्यामुळे राहुलच्या अपार मेहनतीवर जन्मदात्याला मोठा अभिमान आहे. घरी आर्थिक परिस्थिती जेमतेम असली तर आपण आपल्या गुणवंत्त पाल्याचे शिक्षण पूर्ण करेन, असा प्रामाणिक आत्मविश्वास राहुलचे वडील सरोज गुप्ता यांनी व्यक्त केला. राहुलचा छोटा भाऊ शुभम हा सेफ़़ला़हायस्कूल मध्ये आठवीत आहे़(तालुका प्रतिनिधी)