त्या वेडसर महिलेवर अंत्यसंस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:14 IST2021-05-14T04:14:12+5:302021-05-14T04:14:12+5:30

तिवसा : कोरोनाच्या या बिकट काळात स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारालादेखील सख्खे जात नसल्याचे वृत्त आपण वाचतो. मात्र, ...

Funeral on that cracked woman | त्या वेडसर महिलेवर अंत्यसंस्कार

त्या वेडसर महिलेवर अंत्यसंस्कार

तिवसा : कोरोनाच्या या बिकट काळात स्वतःच्या कुटुंबातील व्यक्तीच्या अंत्यसंस्कारालादेखील सख्खे जात नसल्याचे वृत्त आपण वाचतो. मात्र, येथे माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे यांनी पुढाकार घेत माणुसकीचे दर्शन घडविले. तिवसा येथे बऱ्याच वर्षांपासून राहणाऱ्या एका महिलेचा मृत्यू झाला. तिचा बेवारस मृतदेह काही युवकांंना सोबत घेऊन स्मशानभूमीत नेण्यात आला. तेथे अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी तहसीलदार व ठाणेदार देखील उपस्थित होते.

तिवसा शहरातील ही वेडसर महिला बुधवारी मध्यरात्री दगावली. समर्थ सोटागीर महाराज पतसंस्था कार्यालयासमोर प्रभाग क्रमांक १५ मध्ये त्या महिलेचा मृतदेह बेवारस पडून असल्याची माहिती देताच माजी नगराध्यक्ष वैभव वानखडे हे घटनास्थळी पोहचले व या ठिकाणी कायदेशीर बाबी पूर्ण करून अंत्यसंस्कार करण्याबाबत नियोजन केले. सामाजिक कार्यकर्ते विवेक काळे, श्रावण राठी, पंकज पांडे, अनिकेत तालन यश खेडकर, उमेश राऊत, आनंद शर्मा, धीरज ठाकरे, अविनाश पांडे, वैभव बोकडे, राहुल खेडकर, विलास शेंडे उपस्थित होते.

Web Title: Funeral on that cracked woman