राष्ट्रसंतांकडून मिळाला सेवेचा गुरूमंत्र
By Admin | Updated: September 14, 2014 23:46 IST2014-09-14T23:46:13+5:302014-09-14T23:46:13+5:30
राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीशेजारी मोर्शी तालुक्यात चुडामण नदीच्या तिरावर वसलेल्या वरुड गावी पौष वद्य षष्ठी शके १८४५ ला म्हणजे रविवार २७ जानेवारी १९२४ रोजी सूर्यास्ताच्यावेळी प्रतिष्ठित वकील

राष्ट्रसंतांकडून मिळाला सेवेचा गुरूमंत्र
अमरावती : राष्ट्रसंतांच्या कर्मभूमीशेजारी मोर्शी तालुक्यात चुडामण नदीच्या तिरावर वसलेल्या वरुड गावी पौष वद्य षष्ठी शके १८४५ ला म्हणजे रविवार २७ जानेवारी १९२४ रोजी सूर्यास्ताच्यावेळी प्रतिष्ठित वकील कुटुंबातील श्रीधरपंत व अन्नपूर्णाबाई या दाम्पत्याच्या पोटी एक दिव्य बालक जन्माला आले. पुढे हेच बालक ‘अच्युत महाराज’ या नावाने प्रसिध्द होऊन विदर्भात वंदनीय ठरले. रविवारी त्या वंदनीय संत अच्युत महाराजांचा दुसरा पुण्यस्मरण दिन.
१९३७ साली वरुडमधील सातपुडा पर्वताच्या नागठाणा वनस्थळी चुडामण नदीकाठी साधकांना घेऊन राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांनी चातुर्मासात निवास केला होता. त्यावेळी वडिलांसोबत अच्युत महाराजांना राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या दर्शनाचा योग आला.
अश्विन वद्य द्वितीयेला म्हणजे १७ आॅक्टोबर १९४१ रोजी अच्युत महाराज वरखेडक्षेत्री श्रीसंत आडकोजी महाराज संस्थान येथे पोहोचले. २० आॅक्टोबरला राष्ट्रसंत तुकडोजी महाराजही तेथे पोहोचले आणि त्यांनी अच्युत महाराजांना पोटाशी धरले. पुढे राष्ट्रसंतांनी वरखेडच्या शेजारीच वर्धा तटाकाठी अरण्यात झोपडी बांधून दिली आणि सभोवती असणाऱ्या साधू सज्जनांची ओळख करुन दिली. त्यांच्यातील संतत्व राष्ट्रसंतांनी ओळखली होती.