अचलपूर-परतवाड्यात राम मंदिर निर्माण निधी संकलन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:23 IST2021-02-05T05:23:13+5:302021-02-05T05:23:13+5:30

दुचाकी रॅली : अचलपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण व संकलनाची जनजागृती व्हावी, या उद्देशाने अचलपूर-परतवाडा शहरात ...

Fundraising for construction of Ram Mandir at Achalpur-Paratwada | अचलपूर-परतवाड्यात राम मंदिर निर्माण निधी संकलन

अचलपूर-परतवाड्यात राम मंदिर निर्माण निधी संकलन

दुचाकी रॅली :

अचलपूर : अयोध्येतील श्रीराम मंदिर निर्माण निधी समर्पण व संकलनाची जनजागृती व्हावी, या उद्देशाने अचलपूर-परतवाडा शहरात विश्व हिंदू परिषद, बजरंग दल यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी दुचाकी रॅली काढण्यात आली. या रॅलीत रामभक्तांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

रविवारी दुपारी ४ वाजताच्या सुमारास श्री शिवगणेश मंदिर येथून रॅलीची सुरुवात करण्यात आली. ही रॅली श्याम टॉकीज, नेहरू मैदान, दुराणी चौक, मिश्रा चौक, गुजरी बाजार, सदर बाजार, टी. व्ही. टॉवर चौक, टिळक चौक, पोलीस स्टेशन, पट्टलवार लाईन, महावीर चौक, आठवडीबाजार, नृसिंह मंदिर, विदर्भ मील, खिडकी गेट, टक्कर चौक, चावलमंडी, देवडी, बुद्धे खाँ चौक, गांधी पूल होत देवी मंदिर येथे समारोप झाला. रॅलीच्या यशस्वी आयोजनाकरिता अभय माथने, विनय चतूर, गजानन कोल्हे, विश्व हिंदू परिषदचे सुनील खानझोडे, अक्षय अधवाल, डॉ. राजेश उभाड, अरुण घोटकर, जय हावरे आदींनी परिश्रम घेतले. दरम्यान परतवाडा, अचलपूर व सरमसपुरा पोलीस ठाण्यातील हद्दीत पोलिसांनी तगडा बंदोबस्त ठेवला. ठाणेदार सेवानंद वानखडे, सदानंद मानकर, शेख यांनी ठिकठिकाणी कडक बंदोबस्त तैनात केला होता.

Web Title: Fundraising for construction of Ram Mandir at Achalpur-Paratwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.