निधी द्या, आम्ही दोन नव्हे चार टक्के देतो!
By Admin | Updated: March 21, 2015 01:08 IST2015-03-21T01:08:04+5:302015-03-21T01:08:04+5:30
दलितवस्ती सुधार योजनेतून निधी न मिळाल्याप्रकरणी शिवसेनेचे राजू मानकर, रिपाइंचे प्रदीप दंदे

निधी द्या, आम्ही दोन नव्हे चार टक्के देतो!
अमरावती : दलितवस्ती सुधार योजनेतून निधी न मिळाल्याप्रकरणी शिवसेनेचे राजू मानकर, रिपाइंचे प्रदीप दंदे यांनी महापौरांना लक्ष्य करुन ‘निधी द्या, आम्ही दोन नव्हे तर चार टक्के देतो’ असे म्हणून खळबळ उडवून दिली. यावेळी टक्केवारीचा शब्दप्रयोग सभागृहात करणे योग्य नाही, असे सांगून विलास इंगोले, चेतन पवार यांनी महापौरांची पाठराखण केली.
दलितवस्ती सुधार योजनेत काही जवळच्या सदस्यांना निधी वाटप करण्यात आल्याचा आरोप प्रदीप दंदे, राजू मानकर यांनी केला. ज्यांनी टक्केवारी कबूल केली त्यांच्याच वाट्याला हा निधी आल्याचे हे दोघेही म्हणाले. दलितवस्ती निधीतून का डावलले] असा सवाल विचारणाऱ्या राजू मानकरांना शांत राहण्याचा सल्ला विलास इंगोले यांनी दिला. महापालिकेत दलितवस्ती सुधार योजनेचा आलेला निधी तोकडा आहे. पुन्हा निधी आल्यास ज्या सदस्यांना निधी मिळाला नाही त्यांना तो दिला जाईल, असे आश्वासन दिले. मात्र, प्रदीप दंदे यांनी अमरावतीत कोल्हापूरची पुनरावृत्ती होऊ देऊ नका, सर्वांना समान न्याय द्या? अशी मागणी केली.
एकाच प्रभागात निधीचे वाटप करताना दुसऱ्या सदस्यांना विश्वासात का घेतले नाही, यावरही आक्षेप नोंदविला. निर्मला बोरकर, अंबादास जावरे यांनीसुद्धा निधीवाटपात गोंधळ असल्याचा आरोप केला. दरम्यान विलास इंगोले यांनी झालेली चर्चा कार्यवृत्तांतात घेऊ नये, अशा सूचना महापालिका प्रशासनाला दिल्यात.