सावळा गावात मित्रानेच केली मित्राची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 25, 2021 04:13 IST2021-05-25T04:13:04+5:302021-05-25T04:13:04+5:30

पोलीस सूत्रांनुसार, रामभाऊ भीमराव काकडे (४५) असे मृताचे, तर स्वप्निल रमेश मून (३२) हे आरोपीचे नाव आहे. दोघेही रविवारच्या ...

A friend killed his friend in Savla village | सावळा गावात मित्रानेच केली मित्राची हत्या

सावळा गावात मित्रानेच केली मित्राची हत्या

पोलीस सूत्रांनुसार, रामभाऊ भीमराव काकडे (४५) असे मृताचे, तर स्वप्निल रमेश मून (३२) हे आरोपीचे नाव आहे. दोघेही रविवारच्या रात्री १२.३० वाजता दारू पिऊन सावळा गावाच्या चौकात गप्पा मारत असताना एकमेकांत वाद झाला. आरोपी स्वप्निलने रामभाऊच्या डोक्यावर काठी मारली. त्यात तो जागीच ठार झाला. या घटनेची माहिती मिळताच दत्तापूरचे ठाणेदार ब्रह्मानंद शेळके आणि रात्रीला घटनास्थळी धाव घेऊन आरोपीचा शोध घेतला. मात्र, आरोपी मिळाला नाही.

दरम्यान, तीन पोलीस पथके रात्रीच वेगवेगळ्या ठिकाणी रवाना करण्यात आली. सोनेगाव खर्डा परिसरातील एका शेतात आरोपी स्वप्निल आढळला. पोलीस पथकाने लगेच त्याला ताब्यात घेतले. चांदूर रेल्वेचे पोलीस उपविभागीय अधिकारी जितेंद्र जाधव यांनी रविवारी रात्री घटनास्थळाला भेट दिली. या घटनेचा अधिक तपास दत्तापूरचे ठाणेदार ब्रम्हानंद शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली दुय्यम ठाणेदार शिवशंकर खेडकर करीत आहेत.

Web Title: A friend killed his friend in Savla village