लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैगिंक अत्याचार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 22, 2021 04:13 IST2021-04-22T04:13:28+5:302021-04-22T04:13:28+5:30
अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैगिंक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री फ्रेजरपुरा हद्दीत उघडकीस आली. विक्की ...

लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर वारंवार लैगिंक अत्याचार
अमरावती : लग्नाचे आमिष दाखवून एका तरुणीवर वारंवार लैगिंक अत्याचार केल्याची घटना मंगळवारी रात्री फ्रेजरपुरा हद्दीत उघडकीस आली. विक्की करमचंद खत्री (३७ रा. रामपुरी कॅम्प) असे आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी विक्की खत्रीविरुध्द लैंगिक अत्याचारासह ॲट्रॉसिटी ॲक्टनुसार गुन्हा नोंदविला. २९ वर्षीय तरुणी भावासोबत भाड्याच्या घरात राहते. तिच्या भावाच्या ओळखीतील विक्की खत्री याचे घरी येणे-जाणे असल्यामुळे तिचीही ओळख विक्कीशी झाली. ऑगस्ट २०१८ मध्ये विक्कीने तिला लग्नाची विनंती केली. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तरुणी घरी एकटीच असताना विक्की तिच्या घरी पोहोचला. त्याने पुन्हा लग्नासाठी विनवणी केली. परंतु तिने नकार दिला. त्यावेळी विक्कीने जबरदस्तीने तिच्याशी शारीरिक संबंध प्रस्थापित केले. विक्कीने लग्नाचे आमिष दाखवून तरुणीशी वारंवार लैंगिक संबंध प्रस्थापित केले. दरम्यान विक्कीचे लग्न वर्षभरापूर्वीच झाल्याचे तरुणीला माहिती पडले. त्यामुळे तिने विक्कीशी प्रेमसंबंध संपविण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर तरुणीने विक्कीला कॉल करून लग्नाविषयी अनेकदा म्हटले. परंतु पत्नीला जाऊ दे, मला थोडा वेळ दे, लॉकडाऊन संपल्यानंतर आपण लग्न करू, असे विक्की तरुणीला सांगत होता. मात्र, आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच तिने पोलिसांत धाव घेतली. भादंविचे कलम ३७६(२)(एन), ४१७, ५०६, अनुसूचित जाती, जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदानुसार गुन्हा नोंदविला.
बॉक्स
मोबाईलची तोडफोड करून धमकी
१७ एप्रिल रोजी विक्की व त्याची आई तरुणीच्या घरी गेली. मुलाचा संसार आहे, त्याला सोडून दे, असे म्हणून आईने पीडित तरुणीवर दबाव टाकला. त्यानंतर १९ एप्रिल रोजी विक्की पुन्हा तरुणीच्या घरी पोहोचला. त्याने तरुणीच्या मोबाईलची तोडफोड करून धमकी दिली. त्यानंतर संतापलेल्या तरुणीने घटनेची तक्रार फ्रेजरपुरा पोलिसांत नोंदविली.