शहरं
Join us  
Trending Stories
1
"या वेड्याला कसंही करून रोखा...!"; नोबेल विजेत्या माजी आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा एजन्सी प्रमुखांचंं खाडी देश अन् UN ला आवाहन
2
Ashok Kharat Case : भोंदूबाबाचा १ कोटींचा 'महाप्रताप'! अशोक खरातवर १२ वा गुन्हा दाखल; व्यावसायिकाची मोठी फसवणूक
3
शरद पवार-उद्धव ठाकरेंमध्ये चर्चा; बारामती-राहुरी पोटनिवडणुकीबाबत ठरवले? नेमके काय घडतेय?
4
ते जहाज पुन्हा भारताकडे वळले...! चीनकडे का जात होते? 'पिंग शुन'चे गुपित 
5
क्रिकेट सोडून सरकारी नोकरी करायला गेला; चप्पल घालून टाकलेल्या एका चेंडूने 'त्याचे' आयुष्यच बदललं
6
Dhruv Jurel: मास्टरमाइंड जुरेल! आधी दमदार बॅटिंग, मग डोकं लढवून जिंकला सामना, ठरला विजयाचा शिल्पकार
7
अंधश्रद्धेच्या नावाखाली मुलीचा बळी देण्याचा प्रयत्न; स्थानिकांनी वाचवला जीव, आरोपीला बेदम चोप...
8
टाटा ट्रस्टमधील वादाला नवे वळण! TVS च्या वेणू श्रीनिवासन यांचा तडकाफडकी राजीनामा; मेहली मिस्त्रींच्या एका आव्हानाने खळबळ
9
२००० किमी दूर कोलकात्यावर हल्ल्याची धमकी; पाकिस्तानच्या हाती 'अशी' कोणती मिसाइल लागली?
10
Israel Iran War: इस्रायलनं इराणवर हल्ला करण्यासाठी निवडलं मोक्याचं ठिकाण; पुढील ४८ तासांत महाभयंकर घडणार?
11
"हमने ढूंढ निकाला…"; अमेरिकेनं इराणच्या जबड्यातून आपला पायलट कसा बाहेर काढला? वाचा, थरारक मोहिमेची संपूर्ण 'इनसाइड स्टोरी'
12
"महत्त्वाच्या इमारतींमध्ये अजूनही चिनी cctv; सरकार सत्य दडवतंय"; राहुल गांधी यांचा आरोप
13
मध्य पूर्वेतील युद्धातच पाकिस्ताननं रचलं कुभांड; भारताला दिली पोकळ धमकी, कोलकाता टार्गेटवर?
14
“पंजाब माझा आत्मा, केवळ राजकीय आखाडा नाही”; राघव चड्ढा यांचा ‘आप’वर पलटवार, पुरावेच दिले
15
१०० कमांडर, १२ हेलिकॉप्टर अन्...; १९७९ सारखी नाचक्की टाळण्यासाठी अमेरिकेने इराणमध्ये काय काय केले?
16
इराणमध्ये 'सत्तापालट' करायला निघालेल्या ट्रम्प यांची स्वतःची खुर्ची धोक्यात? जनता विरोधात, लोकप्रियताही तळाला
17
आधीच २ तास उशीर, त्यात एक कोच न घेताच ट्रेन सुटली; CSMT स्थानकात अजब प्रकार, प्रवाशांचे हाल
18
आता झाडे बोलणार, स्वतःची ओळखही सांगणार! सोलापुरातील शाळेचा अनोखा प्रयोग, नक्की काय आहे हा प्रकार?
19
हातात लाखोंची रोकड, चक्क THAR मधून घरकामाला यायची 'पारो' मोलकरीण; कोट्यवधीचं गौडबंगाल उघड
20
पेट्रोल-डिझेलनंतर गॅस सिलेंडरच्या किमतीही मोठी वाढ! व्यावसायिक आणि घरगुती एलपीजीचे आजचे दर काय?
Daily Top 2Weekly Top 5

धारणीत शिक्षकांच्या दोन गटांत फ्री-स्टाईल, दोघांचे निलंबन, तिघांची पगारवाढ रोखण्याचा निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 18, 2018 21:45 IST

 अमरावती -  धारणी येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे तालुकास्तरीय जि.प. प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेदरम्यान गुरुवारी शिक्षकांच्या दोन गटांत फ्री-स्टाईल झाले. याप्रकरणी दोन शिक्षकांवर निलंबनाची, तर तिघांविरुद्ध पगारवाढ थांबविण्याची कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली आहे. धारणी तालुक्यातील चटवाबोड व खा-याटेंभरू येथील जिल्हा परिषद शाळांच्या संघादरम्यान कबड्डीचा अंतिम सामना सुरू होता. ...

 अमरावती -  धारणी येथील जिल्हा परिषद मुलांची शाळा येथे तालुकास्तरीय जि.प. प्राथमिक शालेय क्रीडा महोत्सवात कबड्डी स्पर्धेदरम्यान गुरुवारी शिक्षकांच्या दोन गटांत फ्री-स्टाईल झाले. याप्रकरणी दोन शिक्षकांवर निलंबनाची, तर तिघांविरुद्ध पगारवाढ थांबविण्याची कारवाई प्रस्तावित असल्याची माहिती मिळाली आहे. धारणी तालुक्यातील चटवाबोड व खा-याटेंभरू येथील जिल्हा परिषद शाळांच्या संघादरम्यान कबड्डीचा अंतिम सामना सुरू होता. या सामन्यासाठी पंचायत समिती सभापती रोहित पटेल व उपसभापती जगदीश हेकडे हे पंचगिरी करीत होते. सामन्यादरम्यान पंचांच्या एका निर्णयावर वाद निर्माण होऊन दोन्ही पक्षांतील शिक्षक आमने-सामने आले. वाद विकोपाला गेल्यानंतर हमरीतुमरीचे हे प्रकरण एकमेकांना चोप देण्यापर्यंत वाढले. याप्रकरणी पाच शिक्षकांना दोषी ठरविण्यात आले असून, यापैकी दोघांचे निलंबन करण्याचा व तिघांची पगारवाढ थांबविण्याचा निर्णय झाल्याची माहिती आहे. गटशिक्षणाधिकारी मोहम्मद युनूस यांनी मात्र सध्या कोणताही निर्णय झाला नसल्याची माहिती दिली. 

बीडीओ, बीईओ यांची ‘आंखोदेखी’पंचायत समिती सभापती, उपसभापतीच नव्हे, तर धारणीचे गटविकास अधिकारी उमेश देशमुख व गटशिक्षणाधिकारी मोहम्मद युनूस शेख इस्माईल यावेळी उपस्थित होते. शिक्षकांच्या गैरवर्तणुकीबाबत जागीच निपटारा करण्यासाठी दोषी पाच शिक्षकांची या चौघांपुढे पेशी झाली. 

कुठल्याही आयोजनात विद्यार्थ्यांसोबत शिक्षकांनीही शिस्त पाळावी. शिक्षकांनी केलेले कृत्य दुर्दैवी आहे. दोषींवर निश्चित कारवाई केली जाईल. - रोहित पटेल, सभापती, पंचायत समिती, धारणी

टॅग्स :Teacherशिक्षकAmravatiअमरावती