पोलिसांमध्ये ‘फ्री स्टाईल’
By Admin | Updated: October 18, 2015 00:30 IST2015-10-18T00:30:12+5:302015-10-18T00:30:12+5:30
विरुध्द दिशेने वाहतूक करणाऱ्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने वाहतूक नियमाचा उल्लंघन करून चक्क वाहतूक पोलिसांशी फ्री स्टाईल केली.

पोलिसांमध्ये ‘फ्री स्टाईल’
पोलीस पेट्रोलपंपजवळील घटना : राँगसाईड वाहतुकीचे चलान फाडल्याने वाद
अमरावती : विरुध्द दिशेने वाहतूक करणाऱ्या निवृत्त पोलीस उपनिरीक्षकाने वाहतूक नियमाचा उल्लंघन करून चक्क वाहतूक पोलिसांशी फ्री स्टाईल केली. ही घटना शनिवारी सकाळी ११.४५ वाजता पोलीस पेट्रोलपंपाजवळ घडली. रविकांत सुलाभ ढोके असे निवृत्त पोलीस उपनिरीक्षक असून दिलीप प्रभाकर रत्नपारखी व सचिन अशोक श्रीवास असे वाहतूक पोलिसांचे नावे आहे. गर्ल्स हायस्कूल मार्गावरून वाहनचालक पेट्रोल भरण्यास विरुध्द दिशेने जातात.