शेंदूरजनाघाटमध्ये मोफत तपासणी शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 3, 2021 04:11 IST2021-04-03T04:11:48+5:302021-04-03T04:11:48+5:30
शेंदूरजनाघाट : शिवजयंतीनिमित्त हेल्प फाउंडेशनच्यावतीने येथे कोविड-१९ लसीकरण नोंदणी व शर्करा, रक्त तपासणी शिबिर मोफत घेण्यात आले. ...

शेंदूरजनाघाटमध्ये मोफत तपासणी शिबिर
शेंदूरजनाघाट : शिवजयंतीनिमित्त हेल्प फाउंडेशनच्यावतीने येथे कोविड-१९ लसीकरण नोंदणी व शर्करा, रक्त तपासणी शिबिर मोफत घेण्यात आले. याप्रसंगी होमगार्ड संतोष मरकाम यांना श्रद्धांजली वाहण्यात आली.
शिबिराची सुरुवात दिवंगत संतोष मरकाम यांचे वडील राधेलाल मरकाम व भाऊ सुभाष मरकाम यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेच्या पूजनाने झाली. शिबिराला हेल्प फाउंडेशनचे संस्थापक रविराज पुरी, अक्षय इंगळे, अजिंक्य माहोरे, पवन गोरडे, अनिकेत कपिले, उल्हास लेकुरवाडे, प्रशांत सावरकर, प्रशांत भंडारे, सुधाकर बेले, संदीप खडसे, सतीश अकर्ते, धनराज अकर्ते, अंकुश मोघे, सुभाष गोरडे, गौरव गणोरकर, कपिल तरार, तुषार अकर्ते, स्वप्निल देवळे, गजानन कपिले, लुकेश वंजारी, स्वप्निल बोबडे, धीरज बेलसरे, स्वराज्य युवा प्रतिष्ठान व छत्रपती संभाजी राजे ग्रुपचे सर्व पदाधिकारी होते.