शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला अजितदादांविरोधात कुटुंबातलाच उमेदवार देणार?; शरद पवारांचं 'सेफ' उत्तर!
2
SRH चा फलंदाज दुर्दैवीरित्या बाद झाला, मैदानाबाहेर जाताच जिन्यावर बसून ढसाढसा रडला 
3
‘ अज्ञान, आळस आणि अहंकार,या आहेत काँग्रेसच्या तीन मुख्य समस्या’, प्रशांत किशोर यांनी ठेवलं वर्मावर बोट
4
मिचेल स्टार्कचा भेदक मारा, राहुल त्रिपाठी लढला! KKR समोर SRH २० षटकंही नाही टिकला
5
पुणे अपघात प्रकरणात राजकारण करणं किंवा पोलिसांना दोषी धरणं चुकीचं: देवेंद्र फडणवीस
6
समोर दिसतोय राहुल त्रिपाठी OUT आहे, अम्पायरने नाबाद दिले; मिचेल स्टार्कच्या चुकीने वाढले संकट 
7
Kangana Ranaut : “जनतेचे पैसे खाण्यासाठी सत्ता हवी”; कंगना राणौतचा विक्रमादित्य सिंह यांच्यावर हल्लाबोल
8
"हा एक दिवस नेहमीच...", सचिन तेंडुलकरने रतन टाटांसोबतच्या भेटीनंतर लिहिल्या खास ओळी
9
जिद्दीला सलाम! हात नसलेल्या गौसने पायाने पेपर लिहित ७८ टक्के मिळविले, आता स्वप्न 'IAS'चे
10
21 एप्रिलला लग्न, 21 मे रोजी निघाली अंत्ययात्रा; नवऱ्याने महिन्याभरात केली बायकोची हत्या
11
रुग्णाचा झाला होता मृत्यू, डॉक्टरांनी सांगितलं बाहेरून ब्लड टेस्ट आणि सिटी स्कॅन करून घ्या, त्यानंतर...
12
लातूरची 'लेक'! जिद्द ना सोडली झेप घेतली आकाशी; प्रतीक्षा काळे यांचा प्रेरणादायी प्रवास
13
“काँग्रेसवर खूप दबाव, उद्धव ठाकरेंमुळे पक्ष सोडावा लागला”; मिलिंद देवरांचा मोठा गौप्यस्फोट
14
महिलांसाठी धोक्याची घंटा; तुमची ‘ही’ सवय ठरू शकते हार्ट अटॅकचं कारण, वेळीच व्हा सावध
15
"क्रिकेटनं खूप काही दिलंय म्हणून...", टीम इंडियाच्या प्रशिक्षक पदासाठी हरभजन इच्छुक
16
नरेंद्र मोदी यांचा राजकीय उत्तराधिकारी कोण असेल? चर्चांना पंतप्रधानांनी दिला पूर्णविराम; म्हणाले...
17
"मी स्वबळावर राजकारणात येईन…", रॉबर्ट वाड्रा यांचं मोठं विधान
18
खळबळजनक! ‘या’ शहरातून गायब होताहेत लोकांच्या बायका अन्...; 23 दिवसांत 14 जण बेपत्ता
19
IPL 2024 Playoffs Qualifier 1 KKR vs SRH: क्वालिफायर सामन्याआधी उडाली खळबळ, स्टेडियमच्या आत-बाहेर सुरक्षा व्यवस्थेत वाढ, प्रकरण काय?
20
हेमंत सोरेन अन् अरविंद केजरीवाल यांची प्रकरणे वेगवेगळी; ईडीचा सुप्रीम कोर्टात जामिनाला विरोध

पदोन्नतीचा मार्ग मोकळा, शासनादेशाने पदोन्नतीतील साशंकता संपली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 02, 2018 5:02 PM

सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे.

अमरावती : सर्वोच्च  न्यायालयाच्या निर्णयाच्या अधिन राहून खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरावीत, असा आदेश शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाने काढला आहे. त्यामुळे पदोन्नतीतील साशंकता संपली आहे.  अमरावती जिल्हा परिषदेकडील वरिष्ठ सहायक, कनिष्ठ सहायक, अधीक्षक, आरोग्य सहायक, विस्तार अधिकारी, मुख्याध्यापक व शिपाई पदोन्नतीतील मार्ग मोकळा झाला आहे. पदोन्नतीची कार्यवाही विनाविलंब होणे गरजेचे आहे. उच्च न्यायालयाने ४ आॅगस्ट २०१७ रोजी पदोन्नतीतील आरक्षण अवैध ठरवले आहे. उच्च न्यायालयाच्या या आदेशास स्थगितीसाठी शासनाने सर्वोच्च न्यायालयात अपिल दाखल केले आहे. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशास स्थगिती देण्याबाबत अथवा परिस्थिती जैसे थे ठेवण्याबाबत कोणतेही आदेश पारित केलेले नाहीत. त्यामुळे २७ आॅक्टोबर २०१७ पासून राज्यातील सर्व स्तरावरील पदोन्नतीची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली होती. सर्वोच्च न्यायालयात शासनाने दाखल केलेली याचिका प्रलंबित असल्यामुळे तूर्तास पदोन्नतीच्या कोट्यातील खुल्या प्रवर्गातील रिक्त पदे निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात सेवाज्येष्ठतेनुसार सर्वोच्च न्यायालयाच्या अधिन राहून भरण्यात यावीत, असा शासनादेश जारी झाला. सेवाज्येष्ठता यादीतील मागासवर्गीय अधिकारी, कर्मचाºयांना पदोन्नती देण्यापूर्वी ते २५ मे २००४ च्या शासन निर्णयातील तरतुदीनुसार आरक्षणाचा लाभ मिळून सेवाज्येष्ठता यादीत वरच्या स्थानावर आले नाहीत याची खात्री करावी, असेही शासनादेशात नमूद  आहे. अमरावती जिल्हा परिषदेकडील विविध विभागांत बरीच पदे रिक्त आहेत. विस्तार अधिकारी व अन्य पदेही रिक्त आहेत. सामान्य प्रशासन विभागासह इतरही  विभागाकडील अनेक शिपायांची पदोन्नती दोन वर्षे रखडली. पदोन्नतीचा विषय ऐरणीवर आला असताना पदोन्नतीतील आरक्षणासंदर्भात उच्च न्यायालयाने दिलेला निकाल, सर्वोच्च न्यायालयातील सुनावणी, राज्य शासनाने घेतलेली भूमिका यावरून पदोन्नतीची कार्यवाही थांबली होती. आता शासनादेशात खुल्या प्रवर्गातील रिक्त पदांवर लवकरच पदोन्नती होईल. शिपाई पदांपैकी खुल्या प्रवर्गातील पदांवर तातडीने पदोन्नती होण्याचे संकेत मिळत आहेत. 

शासनादेशानुसार जिल्हा परिषदेतील खुल्या प्रवर्गातील पदोन्नतीबाबतची प्रक्रिया राबविली जाईल.- कैलास घोडके,उपमुख्यकार्यकारी अधिकारी, सामान्य प्रशासन जिल्हा परिषद