निःशुल्क बालरोग तपासणी, मार्गदर्शन शिबिर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:17 IST2021-09-17T04:17:16+5:302021-09-17T04:17:16+5:30
----------------- मित्राला शिवीगाळ आली अंगलट नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील फुबगाव येथे मित्राला शिवीगाळ अंगलट आली. श्याम प्रकाश ढवळे (२६) ...

निःशुल्क बालरोग तपासणी, मार्गदर्शन शिबिर
-----------------
मित्राला शिवीगाळ आली अंगलट
नांदगाव खंडेश्वर : तालुक्यातील फुबगाव येथे मित्राला शिवीगाळ अंगलट आली. श्याम प्रकाश ढवळे (२६) हा युवक मित्राला शिवीगाळ करीत एका पानठेल्याशेजारी रस्त्याच्या कडेला बसला होता. ज्ञानेश्वर गुलाबराव लायबर (३५) याने आपल्याला शिवीगाळ होत असल्याचा समज करून धारदार चाकूने त्याच्यावर वार केला. त्याने तो अडविला, मात्र डाव्या कुशीला चोक लागून रक्त निघाले व जमिनीवर कोसळल्याने मुका मार लागला. पोलिसांनी व्न्हा दाखल केला आहे.
--------------
ट्रकची धडक, इसम जखमी
तळेगाव दशासर : विजय लक्ष्मणराव रणदिवे (रा. श्रीराम कॉलनी, अमरावती) यांच्या एमएच २७ बीई ७०५१ क्रमांकाच्या वाहनाला रॉंग साईड आलेल्या ट्रक (एमएच २९ टी १४९८) ने धडक दिली. राष्ट्रीय महामार्गावर झालेल्या या अपघातात विजय यांच्या छातीला मार लागला. तळेगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
-----------------------