शालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुदानात चौपट वाढ
By Admin | Updated: August 3, 2015 00:04 IST2015-08-03T00:04:10+5:302015-08-03T00:04:10+5:30
शालेय क्रीडा स्पर्धांच्या तालुकास्तरीय आयोजनासाठी आतापर्यंत केवळ अडीच हजार रुपयांचा निधी मिळायचा.

शालेय क्रीडा स्पर्धांच्या अनुदानात चौपट वाढ
अमरावती : शालेय क्रीडा स्पर्धांच्या तालुकास्तरीय आयोजनासाठी आतापर्यंत केवळ अडीच हजार रुपयांचा निधी मिळायचा. मात्र, आता शालेय शिक्षण आणि क्रीडा विभागाने या निधीत चौपट वाढ केली आहे. आता शाळांना क्रीडा स्पर्धांच्या अनुदानासाठी १० हजार रूपयांचे अनुदान मिळणार आहे. काही विशिष्ट खेळांसाठी ही मर्यादा ३० हजार रुपयांपर्यंत नेण्यात आली आहे.
शालेय क्रीडा स्पर्धांना दरवर्षी पावसाळ्यात सुरुवात होते. तीन ते चार वर्षांपूर्वी २० ते २५ खेळांचा शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये समावेश होता. मात्र, दरवर्षी त्यात नवीन खेळांची भर पडत आहे. सध्या शालेय क्रीडा स्पर्धांमध्ये तब्बल ८० खेळांचा समावेश आहे. प्रत्येक खेळात विविध वयोगटासाठी स्पर्धा घेण्यात येतात. यातही शहर-ग्रामीण असे विभाजन केले आहे. परंतु केवळ अडीच हजार रुपयांच्या निधीत क्रीडा स्पर्धांचे आयोजन करणे कठीण झाले होेते.