चौथ्या दिवशी ४,२३२, एकूण ७,७८६ उमेदवारी अर्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:18 IST2020-12-30T04:18:18+5:302020-12-30T04:18:18+5:30
अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चौथ्या दिवशी ...

चौथ्या दिवशी ४,२३२, एकूण ७,७८६ उमेदवारी अर्ज
अमरावती : जिल्ह्यात ५५३ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी २३ डिसेंबरपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झालेली आहे. चौथ्या दिवशी ४,२३२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले. उशिरापर्यंत ही प्रक्रिया सुरू होती. आतापर्यंत ७,७८६ उमेदवारांनी अर्ज दखल केले आहेत. बुधवार उमेदवारी दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे व आयोगाने अडीच तासांची मुदतही वाढून दिल्याने इच्छुक उमेदवारांना दिलासा मिळाला आहे.
जिल्हा निवडणूक विभागाने दिलेल्या माहितीनुसार, अमरावती तालुक्यात ३७९, भातकुली तालुक्यात २९४, तिवसा २२५, दर्यापूर ४५९, मोर्शी ३४१, अंजनगाव सुर्जी ३५८, अचलपूर ३८०, धारणी २१८, चिखलदरा ८०, नांदगाव खंडेश्वर २५३, चांदूर रेल्वे १८१, चांदूर बाजार ३०२ व धामणगाव तालुक्यात ४४ असे एकूण ४,२३२ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. ऑनलाईन उमेदवारी अर्ज प्रक्रियेत तांत्रिक अडचणी येत असल्याने बुधवारी ऑनलाईनसोबतच ऑफलाईन अर्ज दाखल करण्याची मुभा आयोगाने दिली आहे. अर्ज दाखल करण्याची वेळही साडेपाच वाजेपर्यंत केल्यामुळे या शेवटच्या दिवशी मोठ्या प्रमाणात गर्दी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे आवश्यक ती खबरदारी घेण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत.
बॉक्स
अर्जांची तालुकानिहाय संख्या
जिल्ह्यात आतापर्यंत ७,७८६ उमेदवारी अर्ज दाखल झाले. यामध्ये अमरावती तालुक्यात ७२९, भातकुली ५४८, तिवसा ४१६, दर्यापूर ८४७, मोर्शी ६४३, वरुड ५१८, अंजनगाव सुर्जी ६३०, अचलपूर ६८९, धारणी ३१८, चिखलदरा १९६, नांदगाव खंडेश्वर ५२१, चांदूर रेल्वे ३३३, चांदूर बाजार ७२५ व धामणगाव रेल्वे तालुक्यात ७२५ अर्ज दाखल झाले आहेत.