चौथा आरोपी अटकेत, पायलट वाहन जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 1, 2019 11:07 PM2019-07-01T23:07:42+5:302019-07-01T23:08:05+5:30

गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा रस्ता निर्धोक करणाऱ्या चौथ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी चारचाकी वाहन जळगावतून जप्त करून अमरावतीत आणले आहे. प्रवीण ऊर्फ दत्तु आप्पासाहेब पाटील (३२, रा. अडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.

Fourth accused arrested, pilot seized | चौथा आरोपी अटकेत, पायलट वाहन जप्त

चौथा आरोपी अटकेत, पायलट वाहन जप्त

Next
ठळक मुद्देगांजा तस्करी : स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : गांजा वाहतूक करणाऱ्या ट्रकचा रस्ता निर्धोक करणाऱ्या चौथ्या आरोपीला स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सोमवारी अटक केली. पोलिसांनी याप्रकरणी चारचाकी वाहन जळगावतून जप्त करून अमरावतीत आणले आहे. प्रवीण ऊर्फ दत्तु आप्पासाहेब पाटील (३२, रा. अडगाव) असे अटकेतील आरोपीचे नाव आहे.
स्थानिक गुन्हे शाखा व लोणी पोलिसांनी २५ जून रोजी नाकेबंदीत एच.आर.४६/सी १६५७ या क्रमाकांच्या ट्रकमधून केळी खाली लपवून ठेवलेला १० क्विंटल गांजा जप्त केला. लोणी पोलिसांना गुन्हा नोंदविल्यानंतर सदर तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे वर्ग करण्यात आला. तपासादरम्यान जप्त केलेला ट्रक हा आंध्र प्रदेशातून जळगावला जात असल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळे पोलिसांची दोन पथके आंध्रप्रदेश व जळगावकरिता रवाना झाली. गांजाची खेप नेणाºया ट्रकला रस्त्याबाबत एक चारचाकी वाहन दिशानिर्देश देत असल्याची बाब पोलिसांसमोर आली होती. त्या वाहनाचा चालक प्रवीण पाटीलला पोलिसांनी जळगावातून अटक करून एमएच ४१ एएस ०८९६ क्रमांकाचे चारचाकी वाहन जप्त केले. प्रवीणला पोलिसांनी सोमवारी न्यायालयासमक्ष हजर करून त्याच्या पोलीस कोठडीची मागणी केली.
पोलीस अधीक्षक दिलीप झळके, अपर पोलीस अधीक्षक श्याम घुगे यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुनील किनंगे, पोलीस उपनिरीक्षक भारत लसंते, एएसआय मूलचंद भांबूरकर, पोलीस हवालदार युवराज मानमोठे, संदीप लेकुरवाळे, चेतन दुबे व चालक नितेश तेलगोटे यांनी ही कारवाई केली.
एक पथक आंध्रात, एक जळगावात
गांजा तस्करीतील अन्य आरोपींच्या शोधात पोलिसांचे एक पथक जळगावला, तर दुसरे पथक आंध्रप्रदेशात गेले आहे. गांजा तस्करीतील मुख्य आरोपी अनिकेत ऊर्फ विक्की प्रमोद पवार व विकास पाटील असल्याची बाब पुढे आली आहे. याशिवाय ‘डॉक्टर’ टोपणनाव असलेला सागर सूर्यवंशी व गोपाल नामक आरोपींना जळगाव पोलिसांनी ताब्यात घेतले असून, त्यांचा ताबा मिळविण्यासाठी अमरावती ग्रामीण पोलीस जळगावाकरिता रवाना झाले आहेत.
९ हजार ५०० रुपयात भाड्याचे वाहन
गांजाचा माल आंध्र प्रदेशातून विदर्भ मार्गे जळगावात पोहोचणार होता. यापूर्वीही अशाप्रकारे गांजाची तस्करी झाल्याची माहिती पुढे येत आहे. गांजातस्करांनी जळगावातील अडगाव येथून चारचाकी वाहन ९ हजार ५०० रुपयांनी भाडेतत्त्वावर घेतले होते.

Web Title: Fourth accused arrested, pilot seized

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.