फ्रेजरपुऱ्यातील चौघांना दंड
By Admin | Updated: October 28, 2015 00:28 IST2015-10-28T00:28:28+5:302015-10-28T00:28:28+5:30
आयुक्तालयात नव्याने सुरू झालेल्या ‘कोर्ट मॉनिटरिंग सेल’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या युक्तिवादामुळे ....

फ्रेजरपुऱ्यातील चौघांना दंड
कारवाई : कोर्ट मॉनिटरिंग सेलचे पहिले प्रकरण
अमरावती : आयुक्तालयात नव्याने सुरू झालेल्या ‘कोर्ट मॉनिटरिंग सेल’च्या माध्यमातून करण्यात आलेल्या युक्तिवादामुळे फ्रेजरपुऱ्यातील एका प्रकरणात प्रथम श्रेणी न्यायदंडाधिकारी प्रगती येरलेकर यांनी ४ आरोपींना २०० रुपये दंड आणि दंड न भरल्यास सात दिवस साध्या कैदेची शिक्षा सुनावली आहे.
महाराष्ट्र जुगार कायद्यांतर्गत २०१४ मध्ये अवधूत सीताराम पाटील, चेतन दीपक उके, गौतम दीपक उके आणि योगेश मारोतराव भीमकर (सर्व रा. भीमज्योत मंडळाजवळ, फ्रेजरपुरा) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. नव्याने अस्तित्वात आलेल्या कोर्ट मॉनिटरिंग सेलच्या माध्यमातून या प्रकरणात यशस्वी बाजू मांडण्यात आली. आयुक्तालयात सुरू करण्यात आलेल्या या ‘कोर्ट मॉनिटरिंग सेल’ मुळे गुन्हे सिध्द होण्याचे प्रमाण वाढणार असून त्यामुळे आरोपींना होणाऱ्या शिक्षेचे प्रमाणही वाढणार आहे.
परिणामी गुन्हेगारीसंदर्भातील प्रकरणे अधिक वेगाने मार्गी लागतील. या अनुषंगाने पहिली सुनावणी यशस्वीरीत्या पार पडली. (प्रतिनिधी)