शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीत काँग्रेसवाले लाखो रुपये घेऊन आले, परंतु...; नरसय्या आडम यांचं खळबळजनक विधान
2
काँग्रेस आमदार महायुतीच्या वाटेवर?; मंत्री छगन भुजबळांच्या भेटीनं पुन्हा चर्चा
3
जम्मू-काश्मीरमध्ये यात्रेकरूंची बस दरीत कोसळली, १५ जणांचा मृत्यू
4
धंगेकरांसह सुषमा अंधारेही अडचणीत येणार?; मंत्री शंभूराज देसाईंनी दिला आक्रमक इशारा
5
"तेव्हा तुमचे डोळे कुठे गेले होते?’’, इस्राइलचा हमास समर्थकांना सवाल
6
"प्रचार करताना तर काहीच त्रास झाला नाही, मग ..."; केजरीवालांच्या तब्येत ठीक नसल्याच्या दाव्यावर EDचे प्रत्युत्तर
7
व्लादिमीर पुतिन यांना उत्तराधिकारी मिळाला? या मोठ्या पदावर केली नियुक्ती, जाणून घ्या कोण आहेत?
8
महापुरुषांचा अपमान करणाऱ्या नेत्यांची यादीच वाचली; जितेंद्र आव्हाडांनी भाजपाला सुनावलं
9
पावसाचं आगमन अन् भारतीय कर्णधाराची तारांबळ; रोहित-द्रविडचा मजेशीर VIDEO
10
Lok Sabha Election 2024 : लोकसभेला सट्टाबाजाराचा कल; फलोदी सट्टा बाजार एनडीएच्या बाजूने की इंडिया आघाडीला पसंती
11
इंग्लंडमध्ये तरूणीने पाकिस्तानच्या शादाबची लाज काढली; एका वाक्यातच बोलती बंद
12
खळबळजनक दावा! राष्ट्रवादीतील पक्षप्रवेशाचा हायव्हॉल्टेज ड्रामा; "मला टॉर्चर केले गेले, अन्..."
13
4 जूनला निवडणूक निकालानंतर हे 50 शेअर रॉकेट बनणार; एक्सपर्ट म्हणतायत, मालामाल करणार!
14
"कंगनाकडे राणी लक्ष्मीबाईसारखे शौर्य आणि...", योगी आदित्यनाथांनी उधळली स्तुतीसुमने
15
"महात्मा गांधींबाबत माहित नाही, मग त्यांना राज्यघटनेबाबतही…’’, मल्लिकार्जुन खर्गेंचा नरेंद्र मोदींवर संताप
16
"हा उद्योग केल्यावर दोन दिवस झोप लागली नाही"; रक्ताचे नमुने बदलणाऱ्या डॉक्टरने दिली कबुली
17
महाराष्ट्रात निकाल काय? Lokniti-CSDS च्या विश्लेषकांची भविष्यवाणी; महायुतीला धक्का
18
"नरेंद्र मोदींनी पंतप्रधानपदाची प्रतिष्ठा घालवली...", मनमोहन सिंग यांची पत्रातून टीका
19
दोन मुलांच्या मृत्यूची जबाबदारी ड्रायव्हरच घेईल; ब्रिजभूषण यांची उडवाउडवीची उत्तरे
20
आमचे येथे श्रीकृपेकरून... अनंत अंबानींचं शुभमंगल 'आमची मुंबई'तच; 'असा' आहे तीन दिवसांचा सोहळा 

चार वर्षीय शिवाचा पतंगाच्या नादात गेला बळी; खोल विहिरीत पडून मृत्यू 

By ऑनलाइन लोकमत | Published: January 23, 2023 3:28 PM

चार तासांच्या रेस्क्यू ऑपरेशनअंती सापडला मृतदेह

वरूड (अमरावती) : नजीकच्या धनोडी येथे राहत्या घरी दोन भावंडं खेळत असताना चार वर्षे वयाच्या शिवाचा पतंगाच्या नादात घराच्या आवारातीलच विहिरीत पडून बळी गेला. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली. दुपारी ३ वाजता मृतदेह विहिरीतून काढण्यास पोलिस आणि नागरिकांना यश आले.

प्राप्त माहितीनुसार, शिवा ऊर्फ शिवांश सुमित मानकर (४, रा. आंबेडकरनगर, धनोडी) असे मृताचे नाव आहे. तो चुलत भावासमवेत आवारात खेळत होता. यादरम्यान एक पतंग घरातील विहीर झाकण्यासाठी ठेवलेल्या टिनपत्र्यावर पडला. तो पतंग काढण्याकरिता शिवा पत्र्यावर गेला आणि त्यासह विहिरीत कोसळला. त्याच्यासोबत खेळत असलेल्या चुलतभावाने लगोलग शिवा विहिरीत कोसळल्याची माहिती घरातील लोकांना दिली. ही घटना रविवारी सकाळी ११ वाजता घडली.

दुपारी ३ च्या सुमारास शिवाचा मृतदेह विहिरीबाहेर काढण्यात आला. यावेळी शेकडो नागरिकांची येथे एकच गर्दी होती. शेंदूरजनाघाट पोलिसांनी मृतदेह ग्रामीण रुग्णालयात पाठविला. शवविच्छेदनानंतर तो नातेवाइकांच्या स्वाधीन करण्यात आला. याप्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद करून पुढील तपास ठाणेदार सतीश इंगळेंसह शेंदूरजनाघाट पोलिस करीत आहेत.

विहिरीचा उपसा करून काढला मृतदेह

विहिरीत पाणी मोठ्या प्रमाणात असल्याने शिवा थेट पाण्यात बुडाला. कुटुंबीयांची धावपळ सुरू असतानाच शेंदूरजनाघाट पोलिस पथक ठाणेदार सतीश इंगळे यांच्यासह घटनास्थळी दाखल झाले. यानंतर विहिरीतील पाण्याचा अतिरिक्त १० अश्वशक्तीचा पंप लावून उपसा करण्यात आला. अखेरीस चार तासानंतर दुपारी ३ वाजता त्याचा मृतदेह पाण्यावर दृष्टीस पडला.

आई-वडिलांचा एकुलता एक

एकुलत्या एक मुलाचा अचानक विहिरीत पडून मृत्यू झाल्याने आई-वडिलांसह मानकर कुटुंबातील सर्वच धाय मोकलून रडत होते. शिवा विहिरीत कोसळल्यानंतर लगोलग काका गौरवने विहिरीत उतरून वाचविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याचा थांगपत्ता लागला नाही. या धावपळीत गौरवच्या हातालासुद्धा लागल्याने तो जखमी झाला.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यूkiteपतंगAmravatiअमरावती