अमरावतीत चार महिलांचा विनयभंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 2, 2018 23:37 IST2018-07-02T23:37:21+5:302018-07-02T23:37:37+5:30
शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी एकाच दिवशी चार महिलांनी विनयभंगाच्या तक्रारी नोंदविल्या. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून एकास अटक केली, तर तिघे पसार झाले आहेत.

अमरावतीत चार महिलांचा विनयभंग
लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये रविवारी एकाच दिवशी चार महिलांनी विनयभंगाच्या तक्रारी नोंदविल्या. पोलिसांनी आरोपींविरुद्ध गुन्हा नोंदवून एकास अटक केली, तर तिघे पसार झाले आहेत.
सर्वप्रथम फे्रजरपुरा हद्दीत एक महिला मैत्रिणीच्या घरून येत असताना घराशेजारीच राहणारे विजय रामटेके व राहुल रामटेके यांनी अश्लील शिवीगाळ करून धमक्या दिल्या. हातवारे करून घरी येण्यासाठी खुणावत असल्याचे महिलेने तक्रारीत नमूद केले आहे. दुसरी घटना राहुलनगरात घडली. एका महिलेने अमोल वरघट (२४) याच्या बहिणीविरुद्ध तक्रार नोंदविली आहे. त्यामुळे आरोपी अमोल वरघट महिलेच्या घरी गेला आणि तिच्याशी अश्लील चाळे करून विनयभंग केल्याची तक्रार महिलेने नोंदविली आहे. तिसरी घटना नांदगावपेठ येथील ेशासकीय वसाहतीत घडली. पीडित महिला व्यापारी संकुलात मजुरीचे काम करते. त्याच ठिकाणी आरोपी गुड्डू ऊर्फ शेख करीम शेख सलीम (रा. चपराशीपुरा) हासुद्धा काम करतो. कामावर असताना आरोपीने महिलेस टाँटिंग केले. याबाबत महिलेने जाब विचारला असता, आरोपीने मारहाण करून तिचा विनयभंग केला. चौथी घटना वलगाव हद्दीतील सालोरा गावात घडली. एका अल्पवयीन मुलाने अल्पवयीन मुलीचा विनयभंग केल्याची तक्रार वलगाव पोलिसांनी नोंदविली आहे.