चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, तीन गंभीर जखमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2021 04:13 IST2021-03-28T04:13:01+5:302021-03-28T04:13:01+5:30

अमरावती : वाहनाची दुचाकीला धडक लागल्याने दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याची घटना वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत पुसदा ते नांदुरा मार्गावर शुक्रवारी ...

Four-wheeler hits two-wheeler, three seriously injured | चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, तीन गंभीर जखमी

चारचाकी वाहनाची दुचाकीला धडक, तीन गंभीर जखमी

अमरावती : वाहनाची दुचाकीला धडक लागल्याने दुचाकीवरील तिघे जखमी झाल्याची घटना वलगाव पोलीस ठाण्यांतर्गत पुसदा ते नांदुरा मार्गावर शुक्रवारी रात्री घडली.

स्वप्निल रामदास टेकाडे (३०, रा. खारवाडी ता. चांदूरबाजार) यांच्या तक्रारीवरून एमएच ०१ एनए ७०४५ चा चालक सागर नारायण मोहोड (३५, रा. राठीनगर) त्याच्या सोबत असलेला विजय श्रीनिवास देशमुख (४६, रा. केवल कॉलनी) याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविला. फिर्यादी यांचा लहान भाऊ व त्याच्या सोबत असलेला गावातील रोशन गजानन मुंदेकर व निकेश देशमुख भुरे हे दुचाकीने खरवाडी एमआयडीसी नांदगावपेठ येथे कामावार जात होते. नांदुराकडून पुसदाकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन चालकाने वाहन भरधाव व निष्काळजीपणे चालवून धडक दिली. त्यामुळे तिघे जखमी झाले. जखमींना प्रथम इर्विन रुग्णालयात व नंतर नागपूर येथे हलविण्यात आले. आरोपीविरुद्ध भादंविचे कलम २७९, ३३७, ३३८ अन्वये गुन्हा नोंदविला.

Web Title: Four-wheeler hits two-wheeler, three seriously injured

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.