चारचाकीची दुचाकीला धडक, दोन ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 7, 2021 04:14 IST2021-05-07T04:14:38+5:302021-05-07T04:14:38+5:30

अमरावती : चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण ठार झाल्याची घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत पिंपळखुटा ...

Four-wheeler hits two-wheeler, killing two | चारचाकीची दुचाकीला धडक, दोन ठार

चारचाकीची दुचाकीला धडक, दोन ठार

अमरावती : चारचाकी वाहनाने दुचाकीला जबर धडक दिल्याने दुचाकीवरील दोन जण ठार झाल्याची घटना फ्रेजरपुरा पोलीस ठाण्यांतर्गत पिंपळखुटा येथे गुरुवारी दुपारी साडेचार वाजता दरम्यान घडली.

पोलीस सूत्रानुसार, उमेश चिंतामण वाकडे (३२), अतुल रामकृष्ण मेश्राम (३० दोन्ही रा. पिंपळखुटा) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघे कु-हाहून पिंपळखुटा येथे येत असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या अज्ञात चारचाकी वाहनाने धडक देऊन पळून गेले. अतुलचा घटनास्थळी, तर उमेशचा उपचाराकरिता नेताना मृत्यू झाला. घटनेची माहिती मिळताच ठाणेदार पुंडलिक मेश्राम, पोलीस उपनिरीक्षक नितीन मगर व ताफा घटनास्थळी पोहोचला. मृताची दुचाकी क्रमांक एम एच २७ सी जी ५१८४ चुराडा झाली आहे. पुढील तपास पोलीस करीत आहे. अज्ञात वाहन चालकाविरुद्ध गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू होती.

Web Title: Four-wheeler hits two-wheeler, killing two