दर्यापूर-अकोला दरम्यान चारचाकीचा भीषण अपघात, तीन गंभीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2021 04:14 IST2021-09-24T04:14:12+5:302021-09-24T04:14:12+5:30

दर्यापूर : अकोला मार्गावर चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामुळे तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. ...

Four-wheeler crash between Daryapur-Akola, three serious | दर्यापूर-अकोला दरम्यान चारचाकीचा भीषण अपघात, तीन गंभीर

दर्यापूर-अकोला दरम्यान चारचाकीचा भीषण अपघात, तीन गंभीर

दर्यापूर : अकोला मार्गावर चारचाकी वाहनाचे नियंत्रण सुटल्याने अपघात झाला. यामुळे तीन जण गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी दिली.

गुरुवारी सकाळी साडेअकराच्या सुमारास गोळेगाव व तोंगलाबादनजीक एमएच ३० एटी ०८३० क्रमांकाचे चारचाकी कार भरधाव वेगाने अकोल्यावरून दर्यापूरकडे येत होते. वाहनाचा वेग नियंत्रित न झाल्याने रस्त्याच्या कडेला जवळपास शंभर मीटरपर्यंत तीन-चार वेळा कोलांटी घेऊन कार नजीकच्या शेतात जाऊन पडली. या वाहनातील तीन व्यत्की गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने अकोला येथे उपचारासाठी खासगी वाहनातून पाठवण्यात आले. अपघातात जखमी झालेले तिघेही व्यक्ती खासगी कृषी कंपनीचे कर्मचारी असल्याचे समजते. दर्यापूर पोलिसांना अपघाताची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनेचा पंचनामा करून पुढील तपास पोलीस करीत आहेत.

230921\img-20210923-wa0005.jpg

दर्यापूर अकोला दरम्यान चार चाकीचा भीषण अपघात, तीन गंभीर जखमी..

Web Title: Four-wheeler crash between Daryapur-Akola, three serious

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.