चारचाकीचा अपघात, एकाचा घटनास्थळी मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:23 IST2021-03-04T04:23:37+5:302021-03-04T04:23:37+5:30

दर्यापूर-अकोला मार्गातील घटना दर्यापूर : अकोला मार्गावर गोळेगाव गावानजीक कारचा टायर फुटल्याने एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर यातील तिघे ...

Four-wheeler accident, one death on the spot | चारचाकीचा अपघात, एकाचा घटनास्थळी मृत्यू

चारचाकीचा अपघात, एकाचा घटनास्थळी मृत्यू

दर्यापूर-अकोला मार्गातील घटना

दर्यापूर : अकोला मार्गावर गोळेगाव गावानजीक कारचा टायर फुटल्याने एकाचा घटनास्थळी मृत्यू झाला, तर यातील तिघे जखमी झाले. बुधवारी दुपारी अडीचच्या सुमारास हा अपघात घडला.

जकी असद खान (२९, रा. अकोट) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. अपघातात जाहीर खान, नावेद हनिफ आणि सुफीयान खान हे जखमी झाले आहेत. इलेक्ट्रिकल इंजिनीअर असलेले जकी खान हे सदर सहकाऱ्यांसोबत अकोला येथून दर्यापूरकडे एम.एच. ३० ए.एफ. ११५० क्रमांकाच्या कारने येत असताना, गोळेगावनजीक त्यांचा वाहनाचा टायर फुटल्याने वाहन अनियंत्रित होऊन रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडाला धडकले. यातील जखमी व्यक्ती शिक्षक असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यांना उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे. पुढील तपास दर्यापूर पोलीस करीत आहेत.

----------

Web Title: Four-wheeler accident, one death on the spot

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.