तिवसा येथील चार जण तडीपार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 14, 2021 04:13 IST2021-05-14T04:13:43+5:302021-05-14T04:13:43+5:30

तिवसा : तिवसा येथील चार गुन्हेगारांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांना शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातून अन्य ...

Four people from Tivasa were deported | तिवसा येथील चार जण तडीपार

तिवसा येथील चार जण तडीपार

तिवसा : तिवसा येथील चार गुन्हेगारांना दोन वर्षासाठी तडीपार करण्यात आले आहे. त्यांना शुक्रवारी अमरावती जिल्ह्यातून अन्य जिल्ह्यात सोडण्यात येणार आहे. अमोल जनार्धन पाटील (२६), किशोर किसनराव सातपुते (३६), सागर सुरेश वाघमारे (२७) व राजेंद्र पांडुरंग बावणे (२३, चौघेही रा. तिवसा) असे तडीपार केलेल्या आरोपींची नावे आहेत. एसपी हरिबालाजी एन यांनी ते आदेश काढले.

या चौघांविरुद्ध खून, मारहाणीसह इतर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. त्यांच्यामुळे तिवसा तालुक्यातील कायदा व सुव्यवस्था धोक्यात येऊ शकते म्हणून त्यांना तडीपार करण्यात आले आहे. त्यांना आता तिवसासह जिल्ह्यात दोन वर्षे येता येणार नाही. या आदेशाचे पालन न केल्यास पुन्हा कठोर कारवाई होऊ शकते. तिवसा पोलीस निरीक्षक रिता उईके यांनी या चारही आरोपींच्या तडीपारीबद्दल जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे अहवाल पाठविला होता.

Web Title: Four people from Tivasa were deported