चार पंचायत समितीला नवे बीडीओ
By Admin | Updated: August 5, 2016 00:26 IST2016-08-05T00:26:55+5:302016-08-05T00:26:55+5:30
जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, भातकुली व तिवसा या चार पंचायत समितींना नव्याने गटविकास अधिकारी मिळाले आहेत.

चार पंचायत समितीला नवे बीडीओ
अनुशेष दूर : ग्रामविकास विभागाचा आदेश
अमरावती : जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे, चांदूरबाजार, भातकुली व तिवसा या चार पंचायत समितींना नव्याने गटविकास अधिकारी मिळाले आहेत. त्यामुळे प्रलंबित असलेल्या कामांना आता वेग मिळेल, असे संकेत आहेत. चारही गटविकास अधिकाऱ्यांच्या नियुक्तीचे आदेश ४ आॅगस्ट रोजी राज्याच्या ग्रामविकास विभागाने निर्गमित केले आहेत.
तसेच गटविकास अधिकाऱ्यांसह चार सहायक गटविकास अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यामध्ये चांदूरबाजार, धामणगाव रेल्वे, तिवसा आणि भातकुली या चार पंचायत समितींचा समावेश आहे. यात नवीन सहायक गटविकास अधिकारी म्हणून प्रफुल्ल भोरखडे चांदूरबाजार, प्रणोती श्री श्रीमाळ, धामणगाव रेल्वे, सोनाली माडकर चांदूररेल्वे, पल्लवी वाडेकर नांदगाव खंङेश्र्वर याप्रमाणे अधिकाऱ्यांना नियुक्ती देण्यात आली आहे.
गटविकास अधिकाऱ्यांच्या नियुक्तीमुळे प्रशासकीय कामकाजात आलेली मरगळ दूर होऊन कामांना वेग येणार आहे. (प्रतिनिधी)
या पंचायत समितींना मिळाले बीडीओ
विशाल शिंदे चांदूर बाजार, पंकज भोयर धामणगाव रेल्वे, सागर पाटील भातकुली, आणि शितल कदम तिवसा या चार अधिकाऱ्यांना गटविकास अधिकारी पदावर नियुक्ती देण्यात आली आहे.