जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पही ८० टक्क्यांवर भरले
By Admin | Updated: September 15, 2015 00:21 IST2015-09-15T00:21:01+5:302015-09-15T00:21:01+5:30
पूर्ण प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ३५.३७ द.ल.घ.मी. आहे व प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी ४५२ मीटर ऐवढी ओ.

जिल्ह्यातील चार मध्यम प्रकल्पही ८० टक्क्यांवर भरले
अमरावती : पूर्ण प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त जलसाठा ३५.३७ द.ल.घ.मी. आहे व प्रकल्पाची पूर्ण संचय पातळी ४५२ मीटर ऐवढी ओ. सद्यस्थितीत ४५१.३० मीटर जलसाठा आहे. हा उपयुक्त जलसाठा ३२.९६ द.ल.घ.मी. ऐवढा असून ९०.८७ टक्के हा जलसाठा आहे.
सापन प्रकल्पात प्रकल्पीय संकल्पीत उपयुक्त पाणीसाठा ३८.६० द.ल.घ.मी. व पूर्ण संचय पातळी ५१४.५० मीटर आहे. आजची जलायश पातळी ५११.२५ मीटर आहे व हा जलसाठा ३१.९२ द.ल.घ.मी. ऐवढा असून ८२.६९ जलसाठ्याची टक्केवारी आहे.
पाणीपुरवठा योजना,
शेती सिंचनाला दिलासा
उर्ध्व प्रकल्पातून अमरावती शहर, नेरपिंगळाईसोबत ७० गावांच्या प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेला पाणीपुरवठा करण्यात येतो. तसेच तिवसा, मोर्शी, चांदूररेल्वे व धामणगाव तालुक्यामधील २० हजार हेक्टर शेतीपिकांना रबीसाठी सिंचनाचे पाणी मिळते. प्रकल्प १०० टक्के भरल्याने पाणीपुरवठा योजनेसह सिंचनासाठी दिलासा मिळाला आहे.
११ तालुक्यांत सरासरीपेक्षा कमी पाऊ स
जिल्ह्यात १४ सप्टेंबरपर्यंत ६४५.९ मी.मी. पाऊ स पडला आहे. पावसाची ही ८९.४ टक्केवारी आहे. यामध्ये सर्वाधिक तिवसा ११८ टक्के अंजनगाव १०४.२ टक्के व अमरावती तालुक्यात १००.२ टक्के पाऊस पडला आहे. अन्य ११ तालुक्यांत पावसाने सरासरीदेखील गाठलेली नाही,
आॅगस्टमधील अतिवृष्टीने भरले जलाशय
जिल्ह्यात ४ व ५ आॅगस्ट रोजी अतिवृष्टी झाली. दोन्ही दिवसांत सरासरी २०० ते २३० मि.मी. पाऊ स जिल्ह्यात पडला. या दोन दिवसांच्या पावसामुळे जलाशयांची पातळी वाढली. जिल्ह्यात जरी सरसरीच्या तुलनेत ७६.७ मी.मी. कमी पाऊ स पडला असला तरी प्रकल्पांनी मात्र धोक्याची पातळी गाठली आहे.