एटीएमद्वारा रुपयाला चार लीटर शुद्ध पाणी
By Admin | Updated: July 8, 2016 00:03 IST2016-07-08T00:03:40+5:302016-07-08T00:03:40+5:30
देवमाळी ग्रामपंचायती अंतर्गत नागरिकांना शुद्ध व थंडगावर पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

एटीएमद्वारा रुपयाला चार लीटर शुद्ध पाणी
देवमाळी ग्रामपंचायत : नागरिकांना घरपोच सेवाही
परतवाडा : देवमाळी ग्रामपंचायती अंतर्गत नागरिकांना शुद्ध व थंडगावर पाणी देण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. या मीनरल वॉटर प्लॅन्टचे उद्घाटन आ.बच्चू कडू यांचे हस्ते करण्यात आले.
शहरी भागात पाणी शुद्धीकरण यंत्र (आर.ओ.) घरोघरी बसविण्याची प्रथा झाली आहे. तर सर्वत्र गढूळ आणि अशुद्ध पाण्यामुळे होणारे जलजन्य आजार टाळण्यासाठी ही व्यवस्था करण्यात येते. मात्र देवमाळी ग्रामपंचायतीने अल्प दरात सर्वसामान्य वजा सर्व ग्रामवासीसाठी शुद्ध आणि थंड पाण्याची सुविधा उपलब्ध करून दिली. त्याचा शुभारंभ आ. बच्चू कडू यांचे हस्ते करण्यात आला. यावेळी सरपंच विद्या चौधरी, प्रहारचे बल्लू जवंजाळ, गजानन भोरे, पंकज सोलरचे राज बारब्दे, सचिव हिवे, चापके, गोपाल शेळके, श्याम कडू, उईके, अभिषेक गुऱ्हेसह नागरिक उपस्थित होते.
एटीएममध्ये रुपयाला चार लीटर
देवमाळी ग्रामपंचायत अंतर्गत घरपोच सेवा मिळविण्यासाठी थंड आणि शुद्ध पाण्याला प्रति २० लीटरच्या कॅनसाठी दहा रुपये द्यावे लागतील. एक रुपया टाकल्यास त्यातून चार लिटर पाणी नागरिकांना मिळणार आहे. घरपोच सेवेत दहा रुपयांत २० लीटर थंड व शुद्ध पाणी डबकीद्वारे पुरविणार आहे. नंतर डबकी परत करावी लागणार आहे. (प्रतिनिधी)
स्तुत्य उपक्रम
तालुक्यात सालेपूरनंतर देवमाळी ग्रामपंचायतीच्या या उपक्रमाचे नागरिकांनी कौतुक केले असून सेवा अखंडित व सुरळीत ठेवण्याची अपेक्षा वर्तविली आहे.