मोर्शी, वरूड तालुक्यांतून चार लाखांची गावठी दारू जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 30, 2020 04:17 IST2020-12-30T04:17:45+5:302020-12-30T04:17:45+5:30

फोटो पी २९ मोशीर् दारू मोर्शी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जामगाव ते बेनोडा मार्गावरून एका चारचाकी वाहनातून ...

Four lakh village liquor seized from Morshi, Warud talukas | मोर्शी, वरूड तालुक्यांतून चार लाखांची गावठी दारू जप्त

मोर्शी, वरूड तालुक्यांतून चार लाखांची गावठी दारू जप्त

फोटो पी २९ मोशीर् दारू

मोर्शी : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने जामगाव ते बेनोडा मार्गावरून एका चारचाकी वाहनातून १० ट्यूब गावठी हातभटटी दारू जप्त केली. घटनास्थळाहून वाहनासह ३ लाख ६७ हजार रुपयांचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. आरोपी दीपक श्यामराव मोरे (४६, रा. जरूड, ता. वरूड) याला अटक करण्यात आली. ़

मध्य प्रदेश सीमेवरील सालबर्डी ते मोर्शी मार्गावर पाळत ठेवून एमपी ४८ एमएस ८८२१ क्रमांकाच्या दुचाकीची तपासणी केली असता, त्यात गावठी हातभट्टी दारू आढळून आली. आरोपी ओझाराम नागोराव युवने (३५, घोरपड, ता. मुलताई, जि. बैतूल, मध्य प्रदेश) याच्याकडून दुचाकीसह ४५ हजार २०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. अधीक्षक राजेश कावळे यांच्या मार्गदर्शनाखाली मोर्शी विभागाचे निरीक्षक के.जी. आखरे, सहायक दुय्यम निरीक्षक रवि राऊतकर तसेच जवान बजरंग थोरात, प्रफुल्ल भोरे यांच्या पथकाने ही कारवाई केली.

-------------

Web Title: Four lakh village liquor seized from Morshi, Warud talukas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.