चार धरणांची दारे उघडली
By Admin | Updated: August 3, 2016 23:59 IST2016-08-03T23:59:52+5:302016-08-03T23:59:52+5:30
जिल्ह्यात सुरू असलेल्या सार्वत्रिक पावसासोबत धरणक्षेत्रात देखील जोरदार पाऊस बरसत असल्याने ...

चार धरणांची दारे उघडली
सतर्कतेचा इशारा : जिल्ह्यात सार्वत्रिक, धरणक्षेत्रात जोरदार पाऊस
अमरावती : जिल्ह्यात सुरू असलेल्या सार्वत्रिक पावसासोबत धरणक्षेत्रात देखील जोरदार पाऊस बरसत असल्याने जिल्ह्यातील पाच पैकी चार प्रकल्पांची दारे बुधवारी उघडण्यात आलीत. नदीनाल्यांना पूर येण्याची शक्यता असल्याने खोलगट भागात राहणाऱ्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे.
जिल्ह्यातील मुख्य उर्ध्व वर्धा प्रकल्पात ५६४ दलघमी संकल्पित साठ्याच्या तुलनेत सद्यस्थितीत ४८६.१८ दलघमी जलसाठा आहे. ही ८६.१९ टक्केवारी आहे. जिल्ह्यात ४ मध्यम प्रकल्प आहत. यापैकी शहानूर प्रकल्पांत संकल्पित ४६.०४ दलघमी साठ्याच्या तुलनेत ३४.१९ दलघमी साठा आहे. ही ७४.२६ टक्केवारी आहे. चंद्रभागा प्रकल्पात संकल्पिय ४१.२५ दलघमी साठ्याच्या तुलनेत २८.०८ दलघमी साठा आहे. ही ६८.०७ टक्केवारी आहे. पूर्णा प्रकल्पात संकल्पित ३५.३७ दलघमी साठ्याच्या तुलनेत २४.४५ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ६९.१३ टक्केवारी आहे.
सर्वच तालुक्यांची सरासरी पार
अमरावती : सपन प्रकल्पात संकल्पित ३८.६० दलघमी साठ्याच्या तुलनेत २८.१४ दलघमी साठा शिल्लक आहे. ही ७२.९० टक्केवारी आहे. जिल्ह्यात ७७ लघुप्रकल्प आहेत. या प्रकल्पांत संकल्पित १७९.८४ दलघमी साठ्याच्या तुलनेत १२५.१२ दलघमी साठा आहे. ही ६९.५७ टक्केवारी आहे.
दरम्यान २४ तासांत १७.७ मिमी पाउस पडला. सर्वाधिक ४४ मिमी पाऊस वरुड तालुक्यात पडला. अमरावती १७.२, भातकुली १६.४, नांदगांव ७.२, चांदूररेल्वे ३.२, धामणगांव रेल्वे ९, तिवसा ८.१, मोर्शी १६.४,अचलपूर २८.४, चांदूरबाजार २०,दर्यापूर ६.४, अंजनगांव ११, धारणी २५.४ व चिखलदरा तालुक्यांत ३५.४ मिमी पाऊस पडला. जिल्ह्यात १ जून ते २ आॅगस्ट या कालावधीत ४४३.७ मिमी पावसाची सरासरी अपेक्षित असताना प्रत्यक्षात ६७५.८ मिमी पाऊस पडला. ही १५२.३ टक्केवारी आहे. जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या तुलनेत ८३ टक्के पाऊस पडला आहे. जिल्ह्यात सर्वच तालुक्यांनी पावसाची सरासरी पार केली असली तरी मोर्शी, अचलपूर व दर्यापूर तालुक्यांनी पावसाची वार्षिक सरासरी ओलांडली आहे.
पावसाच्या टक्केवारीत चिखलदरा माघारले
जिल्ह्यात सद्यस्थितीत १५२.३ टक्के पाऊस पडला. सर्वाधिक १८टक्के पाऊस दर्यापूर तालुक्यात पडला. अंजनगांव १८२, मोर्शी १२३, धारणी १६२, तिवसा १६१, अचलपूर १८०, अमरावती १४०, भातकुली १२६, नांदगांव १४२, चांदूररेल्वे १५८, धामणगांव १४५, वरुड येथे १११ टक्के पाऊस पडला. विदर्भाचे नंदनवन म्हणविणाऱ्या चिखलदऱ्यात फक्त १२४ मिमी पाऊस पडला. हा तालुका पावसाच्या टक्केवारीत जिल्ह्यात १३ व्या स्थानी आहे.
धरणातून असा
होत आहे विसर्ग
उर्ध्व वर्धा धरणाचे तेराही दरवाजे बुधवारी सकाळी ८ वाजता ४० से.मी.ने उघडण्यात आले. या धरणातून ८२१ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे.
शहानूर प्रकल्पाचे २ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले. येथे १२.२५ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे.
पूर्णा प्रकल्पाचे ९ दरवाजे १० सेमीने उघडण्यात आले. येथे ६७.६९ घमीप्रसे पाण्याचा विसर्ग होत आहे.