चार बिडीओंना ‘शो कॉज’
By Admin | Updated: May 7, 2014 01:19 IST2014-05-07T01:19:23+5:302014-05-07T01:19:23+5:30
जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फ त राबविण्यात येणार्या अवर्षण प्रवण विकास कार्यक्रमाच्या

चार बिडीओंना ‘शो कॉज’
अमरावती : जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेमार्फ त राबविण्यात येणार्या अवर्षण प्रवण विकास कार्यक्रमाच्या आढावा बैठकीला हजर राहण्याच्या सूचना दिल्यानंतरही पूर्वसूचना न देता गैहजर राहिल्याप्रकरणी जिल्हातील चार गटविकास अधिकारी (बिडीओ) व काही विस्तार अधिकारी कृषी यांना कारणे दाखवा नोटीस बजाविल्या आहेत.
अवर्षण प्रवण विकास कार्यक्रम (हरियाली) योजनेची आढावा बैठक सीईओंच्या दालनात अनिल भंडारी यांच्या अध्यक्षतेखाली आणि प्रकल्प संचालक यांच्या उपस्थितीत २९ एप्रिल २०१४ रोजीच्या बैठकीत सर्व गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी कृषी यांना लेखी व दूरध्वनीवरून सूचना दिल्यानंतरही १४ पंचायत समितीपैकी तिवसा, धामणगाव रेल्वे, चांदुर बाजार, नांदगाव खंडेश्र्वर आणि तिवसा या पं.स.चे बिडीओ व काही विस्तार अधिकारी (कृषी) अवर्षण प्रवण विकास कार्यक्रम (हरियाली) योजनेच्या आढावा बैठकीला गैहजर असल्याने राहून प्ांचायत समीती स्तरावरील वरील योजनेचे प्रकल्प समाप्ती निर्गमनची माहीती प्रलंबित आहे. माहिती सादर न केल्यामुळे वरील अधिकार्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आल्या आहेत.