मिनीमहापौरांच्या मुलासह चौघांना अटक

By Admin | Updated: June 21, 2014 01:13 IST2014-06-21T01:13:25+5:302014-06-21T01:13:25+5:30

क्राईम ब्रान्चने एका दमदार कारवाई अंतर्गत मिनी महापौरांच्या मुलासह चार आरोपींना अटक केली.

Four arrested with a son of a mini-mom | मिनीमहापौरांच्या मुलासह चौघांना अटक

मिनीमहापौरांच्या मुलासह चौघांना अटक

अमरावती : क्राईम ब्रान्चने एका दमदार कारवाई अंतर्गत मिनी महापौरांच्या मुलासह चार आरोपींना अटक केली. पोलीस आयुक्त सुरेशकुमार मेकला यांच्या मार्गदर्शनात केलेले हे तपासकार्य कौतुकास्पद ठरले.
नावेद ऊर्फ सोनु शहा हबीब शहा (२३, रा. नुराणी चौक) , उमेर मीर्झा जफर बेग (२३, रा. उस्मानिया मशिद कॉर्टर), मो. रिझवान शेख उस्मान (२७,रा. हैदरपुरा, बाब चौक) व इमरान खान नूर खान (२३,रा. वलगाव रोड) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी दोन चोऱ्यांची कबुली दिली.
मालवीय चौकातील आदिदास शोेरुम अज्ञात चोरट्यांनी ४ जानेवारी रोजी फोडून बॅग, डीओ, टी-शर्ट, जोडे व ४४ हजार रुपये रोख असा एकूण १ लाख ६१ हजार ३४७ रुपयांचा माल चोरुन नेला होता. याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी आदिदास शोरुमचे संचालक मो. अबरार मो. सिद्धीकी (रा. पिकीज्या कॉलनी) यांच्या तक्रारीवरुन अज्ञात चोरट्यांविरुद्द गुन्हा नोंदविला. या घटनेचा पोलिसांनी वैज्ञानिक पद्धतीने तपास करुन आरोपी नावेद शहा, उमेर मिर्झा, मो. रिझवान यांना अटक केली.
आरोपींनी चोरीची कबुली दिली. घटनेनंतर आरोपींनी चोरी केलेला माल वाटुन घेतला होता. यापैकी काही माल त्यांनी परिचयाच्या व्यक्तींना विकला. घरझडतीदरम्यान पोलिसांनी या आरोपींच्या घरुन आदिदास कंपनीच्या ५ बॅग, २ जोडे, २ डीओ, ३ टी शर्ट जप्त केले.
सायंस्कोर येथील राष्ट्रीय माध्यमिक सर्वशिक्षण कार्यालयात ७ सप्टेंबर २०१३ रोजी चोरी करुन तेथून ४३ हजार ८०० रुपयांचा माल चोरुन नेल्याची कबुलीही या आरोपींनी दिली. उमेर, मो. रिझवान यांच्यासह इमरान खान यांनी मिळवून ही चोरी केल्याची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी इमरानला अटक करुन त्याच्याकडून ३ सीपीयु, ३ मॉनेटर व १ की बोर्ड जप्त केले. आरोपींकडून आणखी काही चोरीच्या घटना उघडकीस येण्याची शक्यता आहे.
सुरेशकुमार मेकला यांच्या मार्गदर्शनात ही कारवाई गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक प्रमेश आत्राम, सहाय्यक पोलीस निरीक्षक रवी राठोड, राजेश राठोड, शेख नबी, एन. के. चव्हाण, किशोर महाजन, संतोष यादव, शेख, संग्राम भोजने, स्नेहल राऊत यांनी केली.
मशिद परिसरात रचला होता सापळा
आरोपी नावेद ऊर्फ सोनू शहा हा मिनीमहापौरांचा मुलगा आहे. त्याच्यावर यापूर्वी काही पोलीस ठाण्यात दुखापतीचे अनेक गुन्हे दाखल आहेत. त्याला काही दिवसांपूर्वी शहर कोतवाली पोलिसांनी अटक केली. त्याने आदिदास कंपनीचे टी-शर्ट व जोडा परिधान केला होता. याची गुप्त माहिती गुन्हे अन्वेषण शाखेच्या पथकाला मिळाली होती. त्याला गुरुवारी येथील न्यायालयात हजर करण्यात येणार होते. त्याने आदिदास शोरुममध्ये चोरी केल्याचा संशय पोलिसांना आला. यामध्ये उमेर मिर्झा याचाही समावेश असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी दोन दिवसांपासून उमेर मिर्झा याच्या घरासमोर सापळा रचला. परंतु तो पोलिसांच्या हाती लागला नाही. गुरुवारी सायंकाळी तो मशिदीमध्ये येणार असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी पुन्हा उस्मानिया मशिदीसमोर सापळा रचला. तेथे उमेर मिर्झा पोहचताच पोलिसांनी त्याला शिताफिने अटक केली. अटकेदरम्यान त्याने पोलिसांना आदिदास व सायंस्कोर येथे चोरी केल्याची कबुली देऊन त्याच्या साथीदारांची नावे पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी वरील आरोपींना अटक केली.

Web Title: Four arrested with a son of a mini-mom

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.