अवैध दारूसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 19, 2021 04:15 IST2021-01-19T04:15:50+5:302021-01-19T04:15:50+5:30
(फोटो आहे. ) अमरावती : ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशानुसार सीपींच्या विशेष पथकाने एका ...

अवैध दारूसह साडेचार लाखांचा मुद्देमाल जप्त
(फोटो आहे. )
अमरावती : ग्रामपंचायत निवडणूक मतमोजणीच्या अनुषंगाने पोलीस आयुक्त आरती सिंह यांच्या आदेशानुसार सीपींच्या विशेष पथकाने एका कारची झडती घेतली असता, ६६ हजार ६०० रुपयांचा अवैध दारू साठा मिळून आला. पोलिसांनी दारू व कार असा एकूण ४ लाख ६८ हजार १०० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला. ही कारवाई राजापेठ ठाणे हद्दीतील हातुर्णा येथे सोमवारी दुपारी करण्यात आली.
निवडणुकीनंतर अवैध दारू विक्री होण्याच्या शक्यतेवरून सीपींच्या विशेष पथकाने सहायक पोलीस निरीक्षक पंकज चक्रे तसेच इतर कर्मचाऱ्यांनी अवैध दारूची वाहतूक करणाऱ्या कारची (क्र. एमएच २७ आर ७९२८) संशयावरून झडती घेतली असता, अवैध दारू आढळून आली. याप्रकरणी संशयित कारचालक त्रिशुल रमेश सोलव (३५), बंटी मोरय्या(२२) यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पुढील तपास सुरू आहे.